पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आजपर्यंतचे सर्वांत उच्चांकी रुग्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आजपर्यंतचे सर्वांत उच्चांकी रुग्ण

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज उच्चांकी संख्येने रुग्ण वाढत आहेत. मात्र, शनिवारी सायंकाळी साडेसातपर्यंतच्या 24 तासात रुग्णसंख्या प्रथमच एक हजारपेक्षा अधिक झाली. शहरात 1042 आणि शहराबाहेरील 37 असे मिळून 1079 रुग्ण आढळले. दहा दिवसांचा लॉकडाउन संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 843 रुग्ण मिळून आले होते. आता दुसऱ्या दिवशीही उच्चांकी रुग्ण मिळाले. तसेच, 16 जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

रुग्णसंख्येला आळा बसावा म्हणून 14 ते 24 असा दहा दिवसांचा लॉकडाउन होता. यातील पहिले पाच दिवस कडक निर्बंध घातले होते आणि नंतर काहीअंशी शिथील केले होते. दरम्यान, लॉकडाउन संपल्यानंतर पुन्हा सर्वत्र गजबजाट सुरू झाली आहे. बाजारपेठांपासून सर्वत्र गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव लॉकडाउनमध्येही रोखला न गेल्याने आता तो आणखी वाढेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेले, कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले अशा 571 जणांना आज घरी सोडले. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 15 हजार पार झाली असून, 15 हजार 632 वर पोहोचली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

16 मृत्यू या परिसरातील... 

पिंपळे गुरव येथील 70 वर्षीय पुरुष, संत तुकारामनगर पिंपरीतील 56 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 64 वर्षीय महिला आणि 80 वर्षीय वृद्ध, चिंचवड येथील 38 वर्षाचा युवक, 74, 95 वर्षीय दोन वृद्ध, दापोडीतील 45 वर्षीय पुरुष, नेहरूनगर येथील 75 वर्षीय वृद्ध, चऱ्होलीतील 67 वर्षीय पुरुष, मोहनगर येथील 67 वर्षीय पुरुष आणि म्हाळुंगेतील 38 वर्षाचा युवक, विश्रांतवाडीतील 72 वर्षीय वृद्ध महिला, बालेवाडीतील 85 वर्षीय वृद्ध, मुळशी येथील 98 वर्षीय पुरुष, हिंजवडीतील 84 वर्षीय वृद्ध महिला. 
 
सध्या 3563 जणांवर उपचार 

शहरात आजपर्यंत 15 हजार 632 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 10158 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 276 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 74 अशा 350 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3563 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
आजचा वैद्यकीय अहवाल 

  • दाखल झालेले संशयित रुग्ण - 5217 
  • पॉझिटिव्ह रुग्ण - 1079 
  • निगेटिव्ह रुग्ण - 5282 
  • चाचणी अहवाल प्रतीक्षेतील रुग्ण - 1456 
  • रुग्णालयात दाखल एकूण संख्या - 3563 
  • डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण - 4614 
  • आजपर्यंतची कोरोना पॉझिटिव्ह संख्या -15,632 
  • सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या - 3563 
  • आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या - 350 
  • आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या - 10158 
  • दैनंदिन भेट दिलेली घरे - 27,148 
  • दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - 89,239

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com