पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनामुळे एक वर्षांच्या चिमुकलीचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

आज दिवसभरात एक हजार 31 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 44 हजार 405 झाली आहे. आज एक हजार 403 तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 136 झाली आहे. सध्या 12 हजार 429 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील 840 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज कोरोना संसर्ग झालेल्या 18 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात निगडीतील एक वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये 15 रुग्ण शहरातील व तीन रूग्ण शहराबाहेरील आहेत. मृतांमध्ये नऊ पुरुष व नऊ स्त्रियांचा समावेश आहे. आजपर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. परंतु, पहिल्यांदाच एक वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज दिवसभरात एक हजार 31 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 44 हजार 405 झाली आहे. आज एक हजार 403 तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 31 हजार 136 झाली आहे. सध्या 12 हजार 429 सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत शहरातील 840 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मोठी बातमी : घरांचे दर होणार कमी; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

आज मयत झालेल्या व्यक्ती पिंपळे सौदागर (पुरूष वय 73), आकुर्डी (पुरूष वय 70), रावेत (पुरूष वय 89 ), काळेवाडी (पुरूष वय 40), काळेवाडी (पुरूष वय 58), चिखली (पुरूष वय 64), भोसरी (पुरूष वय 80), चिंचवड (पुरूष वय 65 ), पिंपरी (पुरूष वय 75), ताथवडे (स्त्री वय 60), मोशी (स्त्री वय 65), निगडी (स्त्री वय 1), वाकड (स्त्री वय 75 ), दिघी (स्त्री वय 75 ), पिंपळे गुरव (स्त्री वय 63), तळेगाव दाभाडे (स्त्री वय 49 ), खेड (स्त्री वय 57), धनकवडी (स्त्री वय 67) येथील रहिवासी आहेत. 

ऑस्ट्रेलियातील या भागात आहेत तीन गणेशमंडळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one year old died due Corona in Pimpri Chinchwad