पिंपरी-चिंचवड शहरात यंदा बाप्पाचं आगमन असं होणार

पिंपरी-चिंचवड शहरात यंदा बाप्पाचं आगमन असं होणार

पिंपरी : कोरोनाच्या कठीण परिस्थितीतही गणराया घरोघरी विराजमान होणार आहेत. मात्र, संसर्ग टाळण्यासाठी स्टॉलवर गर्दी न करता पिंपरी-चिंचवडकरांनी लाडक्‍या बाप्पाच्या स्वागतासाठी ऑनलाइन बुकींगलाच प्राधान्य दिले आहे. सोशल मीडियावर मूर्त्यांचे फोटो निवडून किंमतही ऑनलाइनच ठरविली जात आहे. त्यानंतर थेट मूर्तीची घरपोच सेवा देण्याचे काम शहरात सुरू झाले आहे. 

दरवर्षी संत तुकारामनगर, काळेवाडी, भोसरी, मोशी, निगडी, चिंचवड या भागात स्टॉल लागलेले असायचे. महापालिकेकडून परवानगी मिळाल्यानंतर दहा दिवस आधी विक्रेत्यांची धडपड सुरू असे. शहरातील या विक्रेत्यांची संख्या जवळपास पाच ते सहा हजार आहे. मात्र, स्टॉलला परवानगी नसल्याने भाडेतत्त्वावरील गाळ्यांमध्ये कमी प्रमाणात मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. स्टॉल नसल्याने विक्रेत्यांची संख्या पन्नास टक्‍क्‍यांनी घटली आहे. यावर्षी वाहतूक खर्चदेखील महागला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लहान आकारांच्या मूर्त्यांच्या किंमतीमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. भाडेतत्त्वावरील गाळ्यांमध्ये सोशल डिस्टन्स राखून मूर्ती विक्री सुरू आहे. विक्रेतेही सुरक्षेची सर्व काळजी घेत आहेत. दरवर्षी ऍडव्हान्स बुकींग मोठ्या प्रमाणात होते, ते यंदाच्या वर्षी कमी झाले आहे. थेट मूर्ती खरेदी करण्यालाच नागरिकांनी प्राधान्य दिले आहे. घरगुती दोन फूट व मंडळाच्या चार फूट गणपती मूर्त्या विराजमान करण्याची परवानगी आहे. घरगुती विसर्जनाच्या दृष्टीने भाविकांनी सुबक शाडू मूर्ती खरेदी करण्यावरही भर दिला आहे. मंडळांनीही बुकींग सुरू केले आहे. ‘‘गेल्या ३० वर्षांपासून केवळ आम्ही पेणच्या शाडू मूर्ती विकतो. शहरात या मूर्त्यांना अधिक मागणी असते. यंदा ती दुपटीने वाढली आहे. नऊ इंचापासून ते तीन फुटांपर्यंत या मूर्ती आहेत. पाचशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत या मूर्तीच्या किंमती आहेत,’’ असे निगडी प्राधिकरणामधील शाडू मूर्ती विक्रेत्या रागिणी लिमये यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

...या आहेत सुबक मूर्ती 

जर्मन नक्षी, चौरंग, पेशवा, दगडूशेठ, लालबागचा राजा, सिद्धिविनायक, म्हैसूरी, तांबडी जोगेश्‍वरी, भाऊ रंगारी हे सर्व गणपती यावर्षी शाडू व प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये उपलब्ध आहेत. 

यावर्षी केवळ १११ मूर्ती खरेदी केल्या आहेत. नाहीतर दोनशे ते तीनशे मूर्ती विक्रीला असतात. यंदा स्टॉलला परवानगी नाही. गाळे भाडे आणि वीजखर्च परवडत नाही. जवळपास ८० टक्‍के नागरिकांनी व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवर पाहूनच मूर्ती बुकींग केले आहे. शिवाय घरपोच सेवा विनामूल्य सुरू आहे. 
- सुमित घाटे, मूर्ती विक्रेता, संत तुकारामनगर 

कोरोनामुळे जोखीम नको. आमच्या कुटुंबातही पॉझिटिव्ह सापडले होते. मात्र, आता काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ऑनलाइनला प्राधान्य देणे गरजेचे आहे. घराबाहेर कमी पडणे हा चांगला पर्याय आहे. 
- महेश लोखंडे, ग्राहक, वल्लभनगर 
 

Edited by Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com