esakal | विद्यार्थी म्हणतायेत, 'ऑनलाइन शाळा अन् दुखतोय डोळा' 

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी म्हणतायेत, 'ऑनलाइन शाळा अन् दुखतोय डोळा' }
  • विद्यार्थ्यांसह पालकांच्या तक्रारी; नोकरदारही त्रस्त, चष्म्यांचे प्रमाण वाढले 
विद्यार्थी म्हणतायेत, 'ऑनलाइन शाळा अन् दुखतोय डोळा' 
sakal_logo
By
पीतांबर लोहार

पिंपरी : ‘‘डॉक्टर साहेब, याचे डोळे नेहमीच लाल होतात. अधूनमधून सूजतातही. रात्र-रात्रभर झोपत नाही, नुसताच रडतो,’’ असं चौथीतील गौरवची आई सांगत होती. अशीच तक्रार आठवीतील श्रेयानेही केली. यांच्यासह अनेक जण डोळ्यांबाबत विविध तक्रारी घेऊन भोसरीतील एका डॉक्टरांकडे आले होते. यात कोणी नोकरदार होते, कोणी शिक्षक होते. पण, विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन झाले आणि अनेकांचे वर्क फ्रॉम होमही. आयटी इंजिनिअर असो की संगणक व मोबाईलद्वारे काम करणारे नोकरदार, शिकवणारे शिक्षक आणि शिक्षण घेणारे विद्यार्थी. आता एक वर्ष होत आलंय; पण ऑनलाइन काही थांबायला तयार नाही. परिणामी, मोबाईलचा वापरही वाढतोच आहे. त्याच्या रेडियशनमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांशी बोलल्यानंतर जाणवले. त्यामुळे काहींना चष्मे लागले असून, काहींच्या चष्म्यांचे नंबर वाढले आहेत. 
 
दुष्परिणाम...
- चष्मा असलेल्या मुलांचा नंबर वाढतोय 
- चष्मा नसलेल्यांना चष्मा लागतो आहे 
- मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतोय 
- मुलांसह मोठ्यांचीही एकाग्रता कमी होत आहे 
- डोळ्यांचा कोरडेपणा वाढतोय 
- डोळे लाल होतात, चुरचुरतात, खुपतात 
- डोळ्यांतून पाणी गळते, थकवा जाणवतो 
 
उपाययोजना... 
- मुलांनी अभ्यासाबरोबर बाहेर खेळायलाही हवे 
- अधूनमधून डोळ्यांचा व्यायाम करावा 
- दर दहा-पंधरा मिनिटांनी स्क्रिनपासून लांब बघावे 
- दहा सेकंदासाठी डोळे बंद ठेवावेत 
- किमान आठ तास झोप आवश्यक 
- डोळे थंड पाण्याने धुवावेत किंवा पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात 
- डॉक्टरांच्या सल्ल्याने आयड्रॉप वापरावा 
 
नेत्रतज्ज्ञ म्हणतात... 
ऑनलाइन शाळांमुळे तीन ते चार तास मुले मोबाईलवर असतात. त्यानंतर काही जण गेम्स किंवा अन्य कार्यक्रम बघतात. त्यामुळे दिवसातील साधारण सहा-सात तास त्यांच्या डोळ्यांसमोर मोबाईल किंवा टॅब असतो. त्यांची स्क्रीन छोटी असल्याने अधिक त्रासदायक ठरते. त्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरावा. यामुळे चष्म्याचा नंबर वाढायची शक्यता खूपच कमी असते. मोबाईल किंवा टॅबच्या स्क्रिनचा डोळ्यांवर नक्की काय परिणाम होतोय, याबद्दल आणखी संशोधन सुरू आहे. पण, चष्म्याचा नंबर वाढतोय, हे नक्की, असं थेरगावातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. कौशिक शहा यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑप्टोमेट्रिस्ट म्हणतात... 
सध्या अनेक जण स्मार्टफोन वापरत आहेत. मोबाईल, लॅपटॉप, एलसीडी वा एलईडीवर अभ्यास केला जात आहे. अनेकांचे कामही त्या माध्यमातूनच सुरू आहे. पण, त्यांचे रेडिएशन डोळ्यांचा रॅटिना डॅमेज करतात. यामुळे लहान मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. डोळ्यांना प्रोटेक्शन म्हणून ब्लू रेकट लेन्स आली आहे. तिच्यावरून रेडिएशन परावर्तित होतात व डोळ्यांना संरक्षण मिळते. चष्मा लागलेला नसला तरी, मोबाईल, लॅपटॉपवर काम करताना झिरो नंबरची ब्लू रेकट लेन्स वापरायला हवी. तिच्यामुळे नव्वद टक्क्यांपर्यंत डोळ्यांचे संरक्षण होते. चष्म्याशिवाय काम करताना पाच ते सहा तासात आपल्याला थकवा जाणवायला लागतो. लेन्समुळे थकवा येत नाही, असं पिंपरीतील ऑप्टोमेट्रिस्ट (दृष्टीमितीतज्ज्ञ) हर्षद पाटील यांनी सांगितले.