esakal | भोसरी रुग्णालयात उभारा ऑक्सिजन प्रकल्प - महेश लांडगे

बोलून बातमी शोधा

Mahesh Landage

भोसरी रुग्णालयात उभारा ऑक्सिजन प्रकल्प - महेश लांडगे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील कोरोना संसर्ग वाढत आहे. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे, की महापालिका प्रशासनाने भोसरी येथील नवीन रुग्णालय हे कोविड केंद्र म्हणून कार्यान्वित केले आहे. या रुग्णालयामध्ये कोविड आजाराचे गंभीर, तसेच ऑक्सिजन आवश्यक असलेले रुग्ण दाखल आहेत. सध्या सुमारे १२० रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. रुग्णालयात १० व्हेंटिलेटर बेड आहेत. मात्र, ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे ७१० एलपीएम क्षमतेची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.’