"...हे राजकारण चालणार नाही"; पार्थ पवार पुन्हा मैदानात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parth pawar
"...हे राजकारण चालणार नाही"; पार्थ पवार पुन्हा मैदानात?

"...हे राजकारण चालणार नाही"; पार्थ पवार पुन्हा मैदानात?

sakal_logo
By
सुधीर काकडे

राज्यात सध्या अनेक शहरांत महानगर पालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवड निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गड मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी देखील दंड थोपटून उतरल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सर्व निवडणुकांच्या रणधुमाळीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे देखील सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतंय.

हेही वाचा: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भरपावसात भाषण;पाहा व्हिडिओ

भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सक्रिय झाले असून, पार्थ पवार देखील या निवडणुकीत सक्रिय झाल्याचे दिसते आहे. नुकतेच पार्थ पवार यांनी केलेले एक ट्विट चर्चेत आहेत. "पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक स्थिरावलेत. विकासात कररूपाने सर्वांनीच समान वाटा दिलाय. त्यामुळे शहरी व बाहेरचा वाद उभा करून सत्ताधाऱ्यांनी लोकांचा अपमान आणि फूट पाडणे थांबवावे. गाववाला व बाहेरचा हे राजकारण आता चालत नाही. आगामी निवडणुकीत लोक याला थारा देणार नाहीत" असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

loading image
go to top