कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्‍ट विद्यार्थ्यांचा 'हा' पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

रविवार, 28 जून 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील आर्किटेक्‍टच्या ४१ विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘व्हर्च्युअल स्टडी’ केला आहे. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रासाठी स्वसंरक्षण प्रकल्पांतर्गत चक्रव्यूह पॅटर्नची रचना केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रुग्णांची व्यवस्था करणे, बफर झोनमधील लोकांना इतरत्र हलविणे आदी तरतुदी त्यांनी सुचविल्या आहेत.

पिंपरी - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील आर्किटेक्‍टच्या ४१ विद्यार्थ्यांनी एकत्र येत ‘व्हर्च्युअल स्टडी’ केला आहे. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रासाठी स्वसंरक्षण प्रकल्पांतर्गत चक्रव्यूह पॅटर्नची रचना केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रुग्णांची व्यवस्था करणे, बफर झोनमधील लोकांना इतरत्र हलविणे आदी तरतुदी त्यांनी सुचविल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अदम्योदय फाउंडेशनअंतर्गत आर्किटेक्‍टच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी एकत्र आले आहेत. कोरोनाबाधित नसलेल्या लोकांमधील आजाराची भीती कमी करणे, प्रतिबंधित क्षेत्राची संख्या कमी करणे, रुग्ण बरे होण्याचा दर वाढविणे, हा या प्रकल्पाचा हेतू आहे. आर्किटेक्‍ट हर्षद मेहंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व कुलकर्णी, मानसी गंभिरे, वरुण भुसानी, तुषार चौहान, श्रुती इंगोले, ऋतुजा बनकर, प्राजक्ता भोसले, धीरज पटेल, शंतनु पवार, साहिल गांधी, शिवानी जाधव आदी तृतीय वर्षाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी हा अभ्यास केला आहे. याबाबत विद्यार्थी अथर्व कुलकर्णी म्हणाला, ‘‘चक्रव्यूह पॅटर्नमध्ये चार वर्तुळाकार स्तर निश्‍चित केले आहेत. अतिसौम्य किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांना केंद्रबिंदूत ठेवण्याबाबत सुचविले आहे.

पिंपरी : सलूनची दुकाने उद्यापासून सुरू होणार, पण दर 'हे' असतील 

त्यासाठी मोकळी जागा तात्पुरती बंदिस्त करून किंवा सार्वजनिक इमारतीचा वापर केला जावा. तेथेच त्यांच्यावर उपचार केले जावेत. त्याबाहेर लोकसंख्येच्या प्रमाणात बफर झोन तयार करून तेथील लोकांना अन्यत्र हलविणे गरजेचे ठरेल. त्याच्या बाहेरील बाजूच्या नारंगी स्तरातील लोकांना ई-पासद्वारे आवश्‍यक परवानगी देणे, तर हिरव्या पट्ट्यातील नागरिकांना दैनंदिन व्यवहार चालू ठेवण्याबद्दल अनुमती असेल. मास्क, सॅनिटायझर वापरणे तसेच नियमितपणे तापमान तपासणे, हे बंधनकारक राहील.’’

पिंपरी : महापौर, पक्षनेत्यांकडून कंटेन्मेंट झोनची पाहणी; नागरिकांना केली ही विनंती

चक्रव्यूह पॅटर्नचा फायदा

 • केंद्रबिंदूत सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगवरून क्वारंटाइन केलेले लोक
 • डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि पोलिस यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था
 • केवळ १० टक्के नागरिकच केंद्रबिंदूत राहिल्यास सुमारे ७० टक्के नागरिकांवरील निर्बंध कमी होतील किंवा हटतील
 • वैद्यकीय, प्रशासकीय व्यवस्था साधणे सोपे होईल
 • शहराच्या इतर भागांत रुग्णांना हलविल्यावर तेथील स्थानिकांचा विरोध टळेल

नोकरीसाठी कुणी पैसे मागत असेल, तर थांबा; तुमच्या सोबत हा प्रकार घडू शकतो

या आहेत सूचना

 • सुलभ वैद्यकीय, प्रशासकीय व्यवस्थेवर भर
 • चारही स्तरांसाठी प्रवेश निश्‍चित करणे, बॅरिकेडिंग करणे
 • प्रतिबंधित क्षेत्राची कमी जागा असल्यास क्‍लस्टर बनविणे
 • सार्वजनिक इमारत, मैदानाचा अभाव असल्यास घरे रिकामी करून तेथे रुग्णांना ठेवणे
 • नारंगी पट्ट्यातील लोकांना गरजेनुसार होम क्वारंटाइन करणे
 • बफर झोनमधील दुकाने हरितपट्ट्यात स्थलांतरित करणे 
 • फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे