पिंपरी - चिंचवड : माजी उपमहापौर घोळवे यांना लाच प्रकरणी अटक

Kishor Gholave
Kishor Gholave
Summary

पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना अटक झाल्यीच माहिती पोलिसांनी दिली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे सांगून लाच घेतल्याप्रकरणी माजी महापौरासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. व्यवसायिकांडून पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर व विद्यामान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केशव घोळवे, गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनश्याम यादव, मलका यादव, हसरत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद तय्यब अली शेख (रा. शास्त्री नगर पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी येथील जागा मेट्रोच्या प्रकल्‍पात जात असल्याने आरोपींनी फिर्यादीसह इतर व्यापाऱ्यांना गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून ५५ हजार रुपये घेतले. तसेच, अन्य व्यवसायिकांकडून भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये बाराशे रुपयांच्या पावत्या फाडून घेतल्या.

Kishor Gholave
असे असणार पिंपरी-चिंचवडचे नवे प्रभाग

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, फिर्यादी यांनी पुन्हा पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी यांना जिवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहे.

घोळवे यांची मूळ ओळख कामगार नेते अशी आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत मोरवाडी-संभाजीनगर प्रभागातून घोळवे विजयी झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. तसंच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे एकनिष्ठ अशीही त्यांची ओळख आहे.

याआधी सहा महिन्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना अटक करण्यात आली होती. त्यांनाही लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होत. आता घोळवे यांना अटक झाल्यानं सहा महिन्यात लाच प्रकरणात नेत्याला अटक होण्याची ही दुसऱी घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com