पिंपरी-चिंचवड : सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला हिरवा कंदील

PCMC
PCMC

महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय; चार ठिकाणी उभारणार प्रकल्प
पिंपरी - शहरातील सांडपाण्यावर चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातील पाण्याचा पुनर्वापर करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने गुरुवारी मान्यता दिली. शहरातील मलनि:सारण केंद्राद्वारे प्रक्रिया केली जाते. त्यातील प्रक्रियायुक्त पाण्याचा शहरातील औद्योगिक व निवासी भागात पुरवठा करण्यासाठी सल्लागारामार्फत विस्तृत आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी खासगी-सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर किंवा हॅम मोडनुसार करण्यास प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाली आहे. आराखड्यानुसार संपूर्ण शहरासाठी प्रतिदिन १२० दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. 

शहराचे रचनेनुसार प्रकल्पाचे चार भाग 
भाग एक : पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसी, चिंचवड 
भाग दोन : चिखली एमआयडीसी, चऱ्होली 
भाग तीन : निगडी, प्राधिकरण व तळेगाव एमआयडीसी 
भाग चार : चाकण एमआयडीसी 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दृष्टिक्षेपात प्रकल्प 
- वाकड, पिंपळ सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, चिंचवड, चिखली, चऱ्होली व एमआयडीसी क्षेत्रात कासारवाडी येथून ७५, चिखलीमधून २० व चऱ्होली येथून 
पाच असे प्रतिदिन सुमारे १०० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध करणे. त्यापैकी आठ दशलक्ष लिटर पाणी पिण्याच्या गुणवत्तेचे शुद्ध करण्यासाठी आरओ प्रणालीचा 
वापर करणे 
- प्रक्रियायुक्त पाण्याच्या पुनर्वापरासाठी सुमारे ३०६ किलोमीटर प्राथमिक जाळे तयार करणे 
- वाकड, पिंपळे सौदागर, कासारवाडी, एमआयडीसी, चिखली य चऱ्होली अशा पाच ठिकाणी एक ते पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ निर्मिती करणे 
- प्रकल्पाचा मूळ खर्च ५३२ कोटी व जीएसटीसह ६५४ कोटी खर्च अपेक्षित आहे 

नगरसेवक काय म्हणाले... 
भाऊसाहेब भोईर :
शहराच्या भविष्यासाठी प्रकल्प महत्त्वाचा आहे. पण, नद्यांमधील जलपर्णी हे प्रशासनाचे अपयश आहे 
मंगला कदम : यापूर्वी संभाजीनगरमध्ये प्रकल्प राबविण्याचे ठरले होते. पण, आता तो बंद आहे. माझा विरोध नोंदवा. 
आशा शेडगे : सांडपाण्याचा पुनर्वापर योग्यच आहे. आधी नद्यांची पाहणी करावी. 
संदीप वाघेरे : नदी सुधार करणे आवश्यक आहे. हा चांगला प्रयत्न आहे. 
राहुल कराटे : नद्यांमध्ये जलपर्णी वाढली आहे. अधिकाऱ्यांनी याचे उत्तर द्यावे. 
सीमा सावळे : सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 
अजित गव्हाणे : पाणीपुरवठ्याच्या चाळीस टक्के गळतीकडे आधी लक्ष द्या. प्रकल्पाबाबत केवळ वरवरची माहिती प्रस्तावात दिली आहे. 
योगेश बहल : विषय मंजूर करण्याची घाई का केली.‌ सत्ताधारी भाजप बोलू देत नाही. 
पंकज भालेकर : हा प्रकल्प राबविण्यासाठी हरित लवाद, पर्यावरण विभागाची परवानगी घेतली आहे. या पूर्वी चिखली प्रकल्पाचे काम थांबवावे लागले आहे. 
विकास डोळस : शहराच्या शेवटच्या टोकाकडील गावांमध्ये पाणी पोहचते की नाही याचा विचार करा 
राजू मिसाळ : आधी विषय मंजूर केल्यानंतर चर्चा करण्यात काहीच तथ्य नाही. नगरसेवकांचे ऐकून घ्यायला हवा होता. 
नामदेव ढाके : सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घाईघाईने घेतलेला नाही. शहराच्या व जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. 
महापौर उषा ढोरे : तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या काळात सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचे सर्व सदस्यांसमोर सादरीकरण झालेले आहे. आयुक्तांनी शहराची पाहणी करावी. 

प्रशासन म्हणते... 
सांडपाणी पुनर्वापर संकल्पना तत्कालीन आयुक्तांच्या संकल्पनेनुसार २०१८ मध्ये मांडण्यात आला होता. त्याचे सादरीकरण तेव्हाच झाले आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवला आहे. सरकारच्या धोरणानुसार एकूण पाणी वापराच्या वीस टक्के पाण्याचा पुनर्वापर आवश्यक आहे. संभाजीनगरमधील प्रकल्पातील वाहिन्यांचे पदपथांच्या कामामुळे नुकसान झाले आहे. नवीन वाहिन्या टाकून महापालिका उद्यानांना पाणी पुरवले जात आहे, असे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. 

आयुक्त राजेश पाटील म्हणाले... 
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल शहराचा आपण विचार करतो, तेव्हा सांडपाणी पुनर्वापर आवश्यक आहे. आपण सकारात्मक दृष्टिने विचार करून आव्हाने स्वीकारायला हवे. संभाजीनगर प्रकल्प पुन्हा सुरू करू. भविष्यात सांडपाणी पुनर्वापर गरजेचे आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com