पिंपरी चिंचवडमध्ये 24 रुग्णांचा आज मृत्यू; 1005 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज 24 जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील 18 व शहराबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये 18 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील एकूण 909 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज 24 जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील 18 व शहराबाहेरील 6 जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये 18 पुरुष व 6 महिलांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील एकूण 909 जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात आज 1 हजार 5 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 53 हजार 289 झाली आहे. आज 891 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 44 हजार 668 झाली आहे. सध्या 10 हजार 713 सक्रीय रुग्ण आहेत. 

मावळात आज 26 नवे पॉझिटिव्ह, तर तळेगावात एकूण रुग्णांचा आकडा सर्वाधिक

आज मयत झालेल्या व्यक्ती चिखली (स्त्री वय 58), चिंचवड ( पुरुष वय 52), भोसरी (पुरुष वय 45), बौद्धनगर (पुरुष वय 55), काळेवाडी (पुरुष वय 70, वय 71), गांधीनगर (पुरुष वय 40), रावेत (पुरुष वय 68), प्राधिकरण (पुरुष वय 85), यमुनानगर (पुरुष वय 73), वाकड (पुरुष वय 69), भोसरी (स्त्री वय 61), पिंपळे सौदागर (स्त्री वय 85), रहाटणी (पुरुष वय 65), पिंपरी (स्त्री वय 50), वाकड (पुरुष वय 61 ), येरवडा (पुरुष वय 73), कोल्हापूर (पुरुष वय 62), मुळशी (पुरुष वय 55), बिबवेवाडी (पुरुष वय 85), चाकण (पुरुष वय 50), दौंड (पुरुष वय 80), निगडी (स्त्री वय 48), थेरगाव (स्त्री वय 56) येथील रहिवासी आहेत. 

जम्बो रुग्णालयांची पिंपरी महापौरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना केल्या सूचना

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad 24 corona patient death and 1005 new corona patient