पिंपरी-चिंचवड शहरात आज 65 रुग्णांच्या मृत्यूची नोंद; तर एवढे आढळले नवीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी 65 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात शहरातील 36 आणि शहराबाहेरील 29 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 265 झाली आहे. आजच्या मृतांमध्ये 49 पुरुष व 16 महिलांचा समावेश आहे. 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी 65 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात शहरातील 36 आणि शहराबाहेरील 29 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 265 झाली आहे. आजच्या मृतांमध्ये 49 पुरुष व 16 महिलांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात आज एक हजार 105 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 75 हजार 267 झाली आहे. आज एक हजार 250 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 382 झाली आहे. सध्या सात हजार 620 सक्रीय रुग्ण आहेत. 

वीज नसल्याने ऑनलाइन स्टडीचे वाजले बारा; नोकरदारही वैतागले!

आज मयत झालेल्या व्यक्ती चिखली (पुरुष वय 53, स्त्री 75), चिंचवड (पुरुष वय 12, 69, 70, 66, 44 व स्त्री वय 55), काळेवाडी (पुरुष वय 57, 62, 56 व स्री वय 65, 42), पिंपरी (पुरुष वय 55, 54, 73), निगडी (पुरुष वय 81, 70), संत तुकाराम नगर पिंपरी (पुरुष वय 73), आकुर्डी (पुरुष वय 67), मोशी (पुरुष वय 62, 75), पिंपळे गुरव (स्त्री वय 65, पुरुष वय 30, 73), कासारवाडी (स्त्री वय 68, पुरुष वय 76, 60), दिघी (स्त्री वय 55), भोसरी (स्त्री 70) येथील रहिवासी आहेत. 

मावळात आज दिवसभरात १०० पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

शहराबाहेरील मृत्यू झालेले रुग्ण डोंगरगाव, उमरज, वाघोली, बिबवेवाडी, जुन्नर, धायरी, चाकण, धनकवडी, वडगाव शेरी, हडपसर, आंबेगाव, देहूरोड, शिवणे, पाषाण, येरवडा, उंड्री, पुणे, धानोरी, माळवाडी, लोणी, बोपोडी येथील रहिवासी आहेत.

सिनेमागृह झाले बंद तरी हार मानली नाही! उच्चशिक्षित जोडप्याने शोधला पर्याय

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad 65 deaths reported today many new cases found