पिंपरी-चिंचवड शहरात आज 570 नवीन रुग्ण 

Corona-patient
Corona-patient

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज बुधवारी 570 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 81 हजार 942 झाली आहे. आज 664 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 76 हजार 50 झाली आहे. सध्या चार हजार 496 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील आठ आणि शहराबाहेरील पाच अशा 13 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 396 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 537 झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 82 व 70), चिखली (वय 75), भोसरी (वय 52), थेरगाव (वय 39), दिगी (वय 48) आणि महिला चिंचवड (वय 74 व 35) येथील रहिवासी आहेत. 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष उरळी देवाची (वय 72), जुन्नर (वय 70), मुंबई (वय 54), चाकण (वय 48) आणि महिला खेड (वय 58) येथील रहिवासी आहेत. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत 15 सप्टेंबरपासून शहरात एक हजार 314 पथकांद्वारे घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आजपर्यंत 22 लाख 36 हजार 922 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील दोन हजार 199 संशयित नागरिक आढळले. त्यांच्या घशातील द्रावांची तपासणी केली असता 524 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com