पिंपरी-चिंचवड शहरात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship exam

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

Scholarship Exam : पिंपरी-चिंचवड शहरात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल घटला

पिंपरी - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात इयत्ता पाचवीचा निकाल २४.१९ टक्के तर तर इयत्ता आठवीचा निकाल १८.३४ टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाचवीचा २.८७ टक्के तर आठवीचा ४.८४ टक्क्‍यांनी निकाल घटला आहे. परिणामी, सरसकट वर्गातील ८० टक्के विद्यार्थी परीक्षेला बसविण्याचा निर्णयाचा परिणाम निकालावर झालेला दिसून येत आहे.

३१ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतिम निकाल ३ जानेवारी रोजी लागला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता पाचवीचे ७ हजार ९५ विद्यार्थी व इयत्ता आठवीचे ४ हजार २६४ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. इयत्ता पाचवीचे महात्मा फुले प्राथमिक शाळा, भोसरीचे ३३ विद्यार्थी ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालय, निगडी १३ विद्यार्थी लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळा,भोसरी ७ विद्यार्थी व मॉडर्न हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे ७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत, अशी माहिती शिष्यवृत्ती समन्वयक सुभाष सुर्यवंशी यांनी दिली.

शिवराज शहरात प्रथम

के.एस.सी. प्रेरणा शाळेचा शिवराज अमित येवले हा विद्यार्थी ९२.६१टक्के गुण मिळवून शहरात प्रथम आला आहे. महापालिकेच्या शाळेतील भुमकरवस्ती कन्या शाळेचे ३ विद्यार्थी श्रमिकनगर प्राथमिक शाळा, व मोशीमुले शाळेतील प्रत्येकी २ विद्यार्थी भुमकरवस्ती मुले प्राथमिक शाळा, विकासनगर प्राथमिक शाळा व जाधववाडी कन्या प्राथमिक शाळा प्रत्येकी १ असे एकून ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

जाधववाडी कन्या शाळेच्या कु. शशिकला राहूल थोरात या विद्यार्थी ने ८५.५७टक्के गुण मिळवून जिल्हा यादित ७० वा क्रमांक पटकावला आहे. दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत इयत्ता ८ वी मध्ये अमृता विद्यालयाचे १० विद्यार्थी, सयाजीनाथ महाराज विद्यालयाचे ९ विद्यार्थी, ज्ञानप्रबोधिनी व मॉडर्न हायस्कूलचे प्रत्येकी ७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

महात्मा फुले माध्यमिक विद्यालय भोसरीतील नविन राजेश शिंदे ८७.२४ टक्के गुण मिळवून शहरात प्रथम आला आहे. महापालिका शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भोसरी व जाधववाडी कन्या शाळेतील प्रत्येकी १ विद्यार्थी असे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादित आले आहेत.

गतवर्षीचा निकाल पाचवीच्या ३ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २ हजार ३३७ विद्यार्थी पात्र ठरले होते. पाचवीचा २७.०१ निकाल लागला होता. आठवीच्या २ हजार १३९ विद्यार्थ्यांपैकी ४२० विद्यार्थी पात्र ठरले असून २३.१८ टक्के निकाल लागला होता.

शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२२-२३

इयत्ता - परीक्षेस बसलेले- उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी

-पाचवी - ७ हजार ९५ -१ हजार ४७३ - २४.१०टक्के

-आठवी - ४ हजार २६४ -६५९ - १८.३४

पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी (इयत्ता पाचवी)

अ.क्र. - गुणवत्ता यादी -विद्यार्थी नाव - टक्के - शाळेचे नाव

१ - ७० -शशिकला राहूल थोरात -८६. ५७ - जाधववाडी कन्या शाळा

२ -१६४ -समर्थ चंद्रकांत सावंत - ८९.२० - श्रमिकनगर प्राथमिक शाळा

३ -३०२ - रोहन संदिप कुंभार - ७६.५९ - कुदळवाडी प्राथमिक शाळा

४ -३११ - अपेक्षा राजाभाऊ कांबळे - ७५.८३ - श्रमिकनगर प्राथमिक शाळा

५ - ३२३ - साईराज नागेश भोसले - ७५.८३. -मोशी मुले प्राथमिक शाळा

६ - ३२८ -क्रांती प्रकाश चौरे - ७५.१६ - भूमकर वस्ती प्राथमिक कन्या शाळा

७- ३३४ - सरगम अनिल तुपसमुद्रे - ७५.१६ - भूमकर वस्ती प्राथमिक कन्या शाळा

८- ३९३ - अनुष्का भागप्पा रेड्डी - ७३.१५ - भूमकर वस्ती प्राथमिक कन्या शाळा

९- ४१३ - वेदांत पुरुषोत्तम झडोकर - ७२.४८ - मोशी मुले प्राथमिक शाळा

१० -४२१ - प्रगती संतोष गायकवाड - ७२.४८ - विकासनगर - प्राथमिक शाळा

११ - ४६८ - नैतिक वसंत राठोड - ७१.१४ - भूमकर वस्ती प्राथमिक मुले शाळा

आठवीचा निकाल अ.क्र. - गुणवत्ता यादी -विद्यार्थी नाव - टक्के - शाळेचे नाव

१- ३३० - नेहा गजानन शिंदे - ६८.४५ - छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालय

२ - ३६४ - साक्षी रणजित गरड - ६७.७८ - जाधववाडी कन्या प्राथमिक शाळा