esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहराने ओलांडला 81 हजारांचा आकडा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहराने ओलांडला 81 हजारांचा आकडा

- बरे झालेल्यांची संख्या 75 हजारांवर
- कोरोना संसर्ग घटतोय

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहराने ओलांडला 81 हजारांचा आकडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत 81 हजार 10 झाली. 75 हजार 230 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या चार हजार 424 रुग्ण सक्रिय आहेत. 

तीन हजार 62 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या फक्त 797 आहे. मात्र, त्यातील 595 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. 136 जण गंभीर असून 66 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा दिवस काढावा लागणार पाण्याविना; उद्याही पाण्याची शक्यता कमीच

आज मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत 19 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मात्र, बरे झालेल्या 264 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एक हजार 377 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधितांमध्ये 50 हजार 431 पुरुष, 30 हजार 573 महिला व 10 तृतीय पंथियांचा समावेश आहे. 

आजपर्यंत बारा वर्षांखालील सहा हजार 182 मुलांना संसर्ग झाला आहे. 13 ते 21 वयोगटातील सहा हजार 641 युवक, 22 ते 39 वयोगटातील 32 हजार 662 तरुण, 40 ते 59 वयोगटातील 24 हजार 728 प्रौढ आणि साठ वर्षांवरील 10 हजार 749 ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग झालेला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाख 84 हजार 700 जणांचे अठ्ठावीस दिवसांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. सध्या 17 हजार 592 जण होम क्वारंटाइन आहेत.

सर्वेक्षणात 399 पॉझिटिव्ह

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत गेल्या पंधरा दिवसांत एक हजार 314 पथकांद्वारे शहरात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. आजपर्यंत 21 लाख 81 हजार 932 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक हजार 963 नागरिकांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 444 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वेक्षण दहा ऑक्टोबरपर्यंत चालणार

सर्वेक्षणाचा पहिला टप्पा दहा ऑक्टोबर रोजी पूर्ण होणार आहे. 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा होईल. या कालावधीत घरी आलेल्या स्वयंसेवकांना खरी माहिती देऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.