पिंपरीकरांनो कोरोना मृत्यूचा आजचा आकडा पाहा, आणि आतातरी काळजी घ्या!

Corona-Virus
Corona-Virus

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 291 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 5505 झाली आहे. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. आज 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 3263 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाची लक्षणे असलेली अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यावर भर देण्यात आला. सध्या 2170 पाॅझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरातील मृतांची संख्या 77 झाली आहे. आज सहा जणांचा मृत्यू झाला. 

आज मृत झालेला रुग्ण देहूरोड, किवळे (स्त्री, वय- ४० वर्षे) ,काळेवाडी (पुरुष, वय-८० वर्षे), घरकुल - चिखली (पुरुष, वय - ४६ वर्षे), गांधीनगर- पिंपरी (स्त्री, वय- ४९ वर्षे), दापोडी (पुरुष, वय-३६ वर्षे), धुळे (पुरुष, वय-६६ वर्षे) येथील रहिवाशी आहेत.

सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायराॅलाॅजी, बीजे मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय एड्स निर्मूलन व संशोधन संस्था अर्थात नारी आणि महापालिकेचे वायसीएम रुग्णालय यांच्यासह खाजगी सहा लॅबमध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणी केली जात आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात व लवकर रुग्ण शोधले जावू लागले आहेत. दररोज सरासरी एक हजार स्वॅब तपासणी केली जात आहे. 

दरम्यान, पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com