गाईंना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणाऱ्या टोळीवर 'मोका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mokka crime

गाईंना इंजेक्शन देत बेशुद्ध करून त्यांची कत्तल करणाऱ्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली आहे.

Pimpri Crime : गाईंना गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करणाऱ्या टोळीवर 'मोका'

पिंपरी - गाईंना इंजेक्शन देत बेशुद्ध करून त्यांची कत्तल करणाऱ्या टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) कारवाई केली आहे.

मोशीन बाबू कुरेशी, शाहिद रहेमान कुरेशी, मोह. अब्दुल रहमान कुरेशी, आशराफ सलमान कुरेशी, मोह. आरिफ सलमान कुरेशी, सोहेल फारूक कुरेशी, राहुल पंडित उर्फ राहुल भैय्या उर्फ राहील महंमद कुरेशी, मोशीन शरीफ कुरेशी, जाफर सुजितकुमार सुभाषचंद्र पानीगृही अशा नऊ जणांवर ही कारवाई झाली आहे.

पिंपरी-चिंचवड, पुणे आयुक्तालयासह पुणे ग्रामीण व रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गाईंना गुंगीकारक इंजेक्शन देत त्यांना बेशुद्ध करून त्यांची कत्तल केल्याप्रकरणी या आरोपींना दिघी पोलिसांनी या आरोपींना अटक केली.

दोन महिने मुंबई, ठाणे व पुणे येथे सापळा रचून दिघी पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून तीन वाहने, कोयते, सत्तूर, नायलॉनच्या दोऱ्या, इंजेक्शन, औषधाची बाटली असा एकूण २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींकडून १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच खुनाचा प्रयत्न, दंगल, गाईच्या चोरी, तस्करी यासह इतर प्रकारच्या २९ गुन्ह्यातही आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.