पिंपरी : कोरोनाशी लढता लढता 'हे' योद्धेच त्याच्या कचाट्यात सापडले अन्...

पिंपरी : कोरोनाशी लढता लढता 'हे' योद्धेच त्याच्या कचाट्यात सापडले अन्...

पिंपरी : चीनमधील वुहानमधून सुरू झालेला कोरोनाचा प्रवास आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत झाला आहे. काहींच्या घराचा उंबरठा त्याने ओलांडला आहे. त्यात त्याच्या विरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांच्या घरांचाही समावेश आहे. हे योद्धे म्हणजे डॉक्टर्स, नर्स, सेवक, पोलिस होत. शहरातील सर्वसामान्यांसह सर्वांचाच जीव वाचवण्यासाठी कोरोनाविरुद्ध लढता लढता हे योद्धेच कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या आठ पोलिसांना संसर्ग

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील तीन अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. यात एक निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, एक महिला उपनिरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

पुणे पोलिस दलात सुरुवात

पुणे शहर पोलिस दलातील पहिला कर्मचारी महिन्यापूर्वी कोरोनाबाधित आढळला. ते पिंपरी चिंचवडमधील चऱ्होली परिसरात राहायला होते. त्यानंतर आणखी दोन कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याचे आढळले. ते चऱ्होली परिसरात राहायला असून, पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत. आता मात्र, पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील आठ जणांना बाधा झाली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकिय सेवकांना बाधा

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोरोना विरुद्ध लढून त्यांनी गेल्या अडीच महिन्यांत १७० पेक्षा अधिक व्यक्तींना विजय मिळवून दिला आहे. पण, आता या योद्ध्यांमधील काहींना संसर्ग झालेला आहे. यात एक डॉक्टर, एक नर्स, एक कर्मचारी यांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुण्यातील योद्ध्यांनाही संसर्ग

पिंपरी चिंचवड शहरात राहणारे मात्र, पुण्यातील रुग्णालयांत सेवा करणाऱ्या योद्ध्यांनाही कोरोनाने पछाडले आहे. कासारवाडी व संभाजीनगरमधील नर्सच्या कुटुंबीयांना सुद्धा बाधा झाली होती. त्या दोघी व त्यांचे कुटुंबीय बरे होऊन घरी आले आहेत. तसेच, पिंपरीतील खाजगी रुग्णालयातील नर्स, भोसरीतील आया आणि च-होलीतील रुग्ण सेवकही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com