
Pimpri Chinchwad News : कर्करोगावर ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण करणार - प्रा. तानाजी सावंत
Pimpri Chinchwad News : - सद्यपरिस्थितीत राज्यात महिलांना गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग (सर्वाइकल कॅन्सर) मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावरची ‘एचपीव्ही’ ही लस ३२०० ते ३६०० रुपयांना असल्याने सरकारकडून दिली जात नाही.
ती राज्य सरकारच्या माध्यमातून कधी व कशा पध्दतीने लसीकरण केले जाईल, असा प्रश्न उपसूचनेच्या माध्यमातून विधानपरिषदेत भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी नुकताच मांडला. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी शाळा व महाविद्यालयातून याबाबत जनजागृती करुन मोफत लसीकरण केले जाईल, अशी घोषणा केली.(Latest Marathi News)
विधान परिषदेत महिला व बालकल्याणच्या विषयाच्या माध्यमातून चर्चा सुरु असताना आमदार उमा खापरे यांनी उपसूचना मांडली. खापरे म्हणाल्या की, ९ ते १४ वयाोगटातील मुलींना सरकार लसीकरण देणार आहे का व याची जनजागृती काशी करणार?(Marathi Tajya Batmya)
९ ते १४ वयोगटातील मुलींना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वाइकल कॅन्सरवर मोफत लसीकरण करणार.
शाळा व महाविद्यालयातून शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक व प्रिसीपल यांना पत्र देऊन त्यांच्या माध्यमातून जनजागृती करणार. पालिकेच्या माध्यमातून त्यांना लस उपलब्ध करुन देणार. मुलींना लस दिली का नाही यावर सरकार स्वत: देखरेक ठेवणार.(Latest Pune News)
- प्रा. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र सरकार.