पिंपरी : बाजारपेठेत उसळी; व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

यंदाची दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी झाली. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून मरगळ आलेल्या बाजार पेठेतही मोठी आर्थिक उलाढाल झाली. यामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
market
marketsakal

पिंपरी - यंदाची दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी झाली. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून मरगळ आलेल्या बाजार पेठेतही मोठी आर्थिक उलाढाल झाली. यामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले. काहींचे तर व्यवसायच बंद झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. सणासुदीच्या काळातही व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने निर्बंधही कमी करण्यात आले. त्यामुळे काही दिवसांपासून व्यवसाय पूर्ववत होत आहेत. दसऱ्यापासून दुकानांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. अशातच प्रत्येकाने कोरोनाचे संकट विसरून दिवाळीचा सण साजरा केला. यामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांनी व्यावसायिकांना दिलासा दिला आहे.

शहरातील पिंपरी बाजारपेठेसह चिंचवड, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, मोशी, भोसरी, दापोडी , देहूरोड येथील बाजार पेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाली. मागील पंधरा दिवसापासूनच किराणा दुकानांसह कपडे, इलेकट्रोनिक वस्तू, सोने विक्रीचे दुकानांसह वाहनांचे शोरूम सजले होते. स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब यांच्यासह इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेतही मोठी उलाढाल झाली. भाऊबीजेला तसेच पाडव्याला भेटवस्तू म्हणून स्मार्टफोन, टॅब देण्याऱ्यांचे प्रमाण अधिक होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्सही दिल्या गेल्या. ग्राहकांनीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने व्यापारी सांगतात. तसेच दिवाळीत झालेल्या उलाढालीमुळे कोरोनाच्या कालावधीतील आर्थिक संकटातून सावरण्यास काहीशी मदत झाल्याचेही काही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

market
दिवाळीच्या सुट्यांमुळे पर्यटन नगरी गजबजली

होऊ दे खर्च ...

एका महिन्यात दोन पगारांसह बोनस मिळाल्याने ग्राहकांनी ‘होऊ दे खर्च’ या पद्धतीने खरेदी केली. साडेतीन मुहूर्तांतील या एका मुहूर्तावर सोने, वाहने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला उधाण आले. सराफ पेढीसह वाहनांचे शोरूम, मोबाईल शोरूम, कापड आदी बाजारपेठांत कोट्यवधींची उलाढाल झाली.

कापड बाजारात गर्दी

जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी कापड व रेडिमेड विक्री करणाऱ्यांनी सवलती दिल्या होत्या. पंधरा ते वीस टक्के सूट जाहीर केल्याने ग्राहकांनीही बंपर खरेदी केली. पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, सांगवी, देहूरोड, दापोडी आदी भागांतील दुकानांत दिवाळीत मोठी गर्दी झाली होती.

परंपरागत दागिने खरेदीकडे कल

सराफ व्यावसायिकांनी खरेदीवर सवलत योजना लागू केली होती. दरही काहीसे कमी झाले. यामुळे दागिन्यांचीही मोठी खरेदी झाली. परंपरागत दागिने खरेदीकडे नागरिकांचा कल होता.

market
पिंपरी : भाच्याचा मामावर प्राणघातक हल्ला

वाहनांचे शोरूम फुल्ल

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यासाठी शोरूम हाऊसफुल्ल झाली होती. दुचाकी व चारचाकीची विक्री मोठ्याप्रमाणात झाली. वाहनांचे बुकिंग करून पाडव्या दिवशी डिलिव्हरी घेणाऱ्या ग्राहकांची गर्दी अधिक जास्त होती.

महिनाभरापासून तयारी

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दिवाळी हा मोठा सण आला. यामध्ये व्यवसायाला चालना मिळेल, या उद्देशाने व्यापारीही तयारीत होते. महिनाभरापासून तयारी सुरू केली. माल भरण्यासह, बाहेरून माल आणणे, साठा करून ठेवणे याचे अगोदरपासूनच नियोजन केले होते.

आनंदी आनंद चोहीकडे

मागील दीड वर्ष कोरोनामुळे सर्वांनाच आव्हानात्मक होते. वेगवेगळी संकटे येत होती. यातून सावरण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करीत होते. मागील वर्षी दिवाळीसह इतर कोणताच सण उत्साहात सण साजरा करता आला नाही. अशातच आता कोरोनाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वाना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी दरवर्षीप्रमाणे साजरी झाली. ‘आनंदी आनंद चोहीकडे’ असे उत्साही वातावरण पहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com