महापौर पदाचा कार्यकाळ संपला; गाडी जमा करुन उषा ढोरे दुचाकीवरून घरी

फोटो ओळ- पिंपरी महापौर पदाचा कार्यकाळ संपताच महापौर उषा ढोरे यांनी महापालिकेची गाडी प्रशासनाकडे जमा करत दुचाकीवरून घरी परतल्या.
फोटो ओळ- पिंपरी महापौर पदाचा कार्यकाळ संपताच महापौर उषा ढोरे यांनी महापालिकेची गाडी प्रशासनाकडे जमा करत दुचाकीवरून घरी परतल्या.Team eSakal

जुनी सांगवी ता.१३ : पिंपरी-चिंचवड महापालिका लोकप्रतिनिधींचा १३ मार्च कार्यकाळ संपला आहे. रविवार (ता.१३) मार्चपासून प्रशासनानेकडे शहराचा कार्यभार राहणार आहे.रविवार शहरातील विविध कार्यक्रम आटोपून महापौर उषा ढोरे यांनी महापौरांसाठी असलेली चारचाकी गाडी कार्यकाळ संपल्याने महापालिका प्रशासनाकडे जमा करून सर्वांचे आभार मानत स्वतः च्या दुचाकीवरून घरी रवाना झाल्या.

फोटो ओळ- पिंपरी महापौर पदाचा कार्यकाळ संपताच महापौर उषा ढोरे यांनी महापालिकेची गाडी प्रशासनाकडे जमा करत दुचाकीवरून घरी परतल्या.
पुणेकरांची कोंडीतून सुटका; नळ स्टॉप उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

दरम्यान, महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने चार महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना करून त्यावर हरकती व सुनावणीही घेतली आहे. प्रभागनिहाय मतदारयाद्यांची विभागणी केली आहे. आता केवळ अंतिम प्रभाग रचना जाहीर होणे बाकी आहे. त्यानंतर निवडणूक आयोग केव्हाही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल? असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व अन्य इच्छुकांनी तयारी केली आहे.

फोटो ओळ- पिंपरी महापौर पदाचा कार्यकाळ संपताच महापौर उषा ढोरे यांनी महापालिकेची गाडी प्रशासनाकडे जमा करत दुचाकीवरून घरी परतल्या.
अजान सुरु होताच अजित पवारांनी थांबवलं भाषण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com