कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले...

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत पिंपरी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले...

  • 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचीही आवश्यकता नाही. त्यांनी होम आयसोलेशन अर्थात घरीच उपचार किंवा कोविड केअर सेंटरमध्ये रहावे.
  • 20 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे दिसतात. पण, त्यातील बहुतांश म्हणजे साधारणत: 15 टक्के रुग्णांत सौम्य लक्षणे आढळत आहेत. यामध्ये सौम्य ताप, कफ, थंडी, सर्दी, घशात खवखव अशी लक्षणे आहेत. 
  • केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आढळत आहेत. त्यातही अनेकांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. त्यांनाच अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले जात आहे. त्यांना ऑक्सिजनची गरज भासू शकते. 
  • राष्ट्रीय, राज्य व जिल्ह्याच्या तुलनेत मृत्यूदर कमी असून, तो अवघा 1.3 ते 1.4 टक्के आहे. 
  • मृत्यूदर कमी करण्यासाठी संशयित व्यक्ती लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार सुरू करणे, आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाचे तीव्र लक्षणे दिसत आहेत. 
  • लक्षणे नसलेले रुग्ण होम आयसोलेशन, हॉटेलमध्ये स्वतंत्रपणे राहू शकतात. अशा रुग्णांसाठी कॉल सेंटर सुरू केले आहे. त्याद्वारे वैद्यकीय प्रशासन व अधिकारी रुग्णांच्या संपर्कात राहतील. 
  • अधिकाधिक रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत, हा लॉकडाउनचा उद्देश आहे. तपासणी लवकर व्हावी, यासाठी अॅंटिजन किट उपलब्ध झाले आहेत. त्याद्वारे अवघ्या मिनिटांत रिपोर्ट मिळू शकतील. 
  • कोविड केअर सेंटरमध्ये व्हिआयपी सुविधा पुरविणे अशक्य आहे. कारण, त्यासाठी स्कूल, कॉलेज यांसारख्या इमारती वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे होम आयसोलेशन चांगला पर्याय ठरतो. 

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com