MLA Ashwini Jagtap : १०० नगरसेवक निवडून आणून महापालिकेवर पुन्हा भाजपचाच झेंडा फडकवायचा

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्याबद्दल आभार मानण्यासाठी मेळावा आयोजित केला होता.
MLA Ashwini Jagtap
MLA Ashwini JagtapSakal
Summary

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्याबद्दल आभार मानण्यासाठी मेळावा आयोजित केला होता.

पिंपरी - महापालिका निवडणुकीत अब की बार १०० नगरसेवक हे ‘टार्गेट’ पूर्ण करायचे आहे. महापालिकेवर पुन्हा भाजपचाच झेंडा फडकवायचा आहे, असा निर्धार नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनी नुकताच रहाटणी येथे व्यक्त केला. तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामुळे पोटनिवडणुकीतील विजय सुकर झाल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाला. त्याबद्दल आभार मानण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी आमदार जगताप बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, एकनाथ पवार, अमित गोरखे, अनुप मोरे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाल्या की, ‘दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अवघ्या २१ दिवसांतच पोटनिवडणूक लागली. त्यामुळे पोटनिवडणुकाला सामोरे जाणे जड गेले होते. पण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी निवडणुकीची सर्व धुरा पेलली. सर्वांच्या आशिर्वादामुळे घराबाहेर पाऊल टाकून निवडणुकीला मी उभी राहिले. सर्वांनी लक्ष्मणभाऊंची कमी जाणवू दिली नाही. कुटुंबाचीही मला तितकीच साथ मिळाली.’

खासदार बारणे म्हणाले की, 'कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे चांगले काम केले. पोटनिवडणुकीत आपले काही हक्काचे मतदार बाहेर पडले नाहीत. ते बाहेर पडले असते तर; अश्विनी जगताप यांचा ५० हजाराच्या मताधिक्याने विजय झाला असता.'

आमदार खापरे म्हणाल्या की, 'प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख पार पाडल्यामुळे आज आपल्या वहिनी आमदार झाल्या. आता महापालिका निवडणूक लढवणाऱ्यांनी निवडून येण्यासाठी आपापल्या प्रभागात कामाला सुरूवात करावी.'

MLA Ashwini Jagtap
PCMC Budget 2023 : समाज विकास विभागासाठी १७१ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद

कुटुंब फोडण्याचा जेवढा प्रयत्न केला तेवढे एक झाले - शंकर जगताप

शंकर जगताप म्हणाले की, 'पोटनिवडणुकीत भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची उणीव जाणवू दिली नाही. खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे यांनीही मोठी साथ दिली.

येथील जनतेने व कार्यकर्त्यांनी ३०-३५ वर्षे भाऊंवर प्रेम केले. तेच प्रेम, तोच जिव्हाळा या पोटनिवडणुकीत दिसून आला. पण पोटनिवडणुकीची संधी साधून काही अल्पसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचे काम केले. दुःखाच्या प्रसंगात परकीयांसोबत स्वकीयांनीही आमच्या कुटुंबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. असे दुःख दुश्मनावरही येऊ नये. राजकीय इच्छा कधी प्रकट करायची तेवढे ज्ञान व भान सर्वांना असले पाहिजे.

विघ्नसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंब फोडण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे आमचे कुटुंब एक आणि घट्ट झाले. त्यामुळे त्या विघ्नसंतुष्ट लोकांचेही मी आभार मानतो. आताच्या यशाने हुरळून न जाता महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे गांभीर्य ओळखून काम करावे लागणार आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com