समाज विकास विभागासाठी १७१ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pcmc

समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत महिला व युवतींसाठी उड्डान, उमेद जागर या योजनांद्वारे रोजगार वाढीसाठी व उच्चशिक्षणासाठी मदतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

PCMC Budget 2023 : समाज विकास विभागासाठी १७१ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत महिला व युवतींसाठी उड्डान, उमेद जागर या योजनांद्वारे रोजगार वाढीसाठी व उच्चशिक्षणासाठी मदतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर; दिव्यांग, मागासवर्गीय व अन्य कल्याणकारी योजनाही कार्यान्वित राहणार आहेत. यासाठी १७१ कोटी ९७ लाख रुपयांची तरतूद सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. १४) दिली.

समाज विकास विभागासाठी अर्थसंकल्पात काय...

- महिला बालकल्याण योजने अंतर्गत विविध उपक्रम

उड्डान योजने अंतर्गत -

- महिला संसाधन केंद्राद्वारे कौटुंबिक हिंसाचार, पिडीत, घटस्फोटित व अत्याचारित महिलांना एकाच ठिकाणी समुपदेशन, कायदेशीर सल्ला, वैद्यकीय सुविधा

- युवतींना परदेशी उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य

- स्पर्धा परिक्षा देणाऱ्या युवतींना शासकीय, खासगी संस्थांमध्ये प्रवेश, अर्थ सहाय्य

- किशोर वयीन मुली व महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी सोई-सुविधा देणे

- महिलांना ज्ञान कौशल्य, वाढ प्रशिक्षण व प्रगत प्रशिक्षण

- शहरातील नोकरी करणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या महिला वसतीगृहात राहत असल्यास अर्थसहाय्य

उमेद जागर अंतर्गत -

- कोरोना काळातील विधवा महिला बचत गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्टीचिंग युनिट

- व्यवसायासाठी लागणारी साधनसामुग्री व भांडवल उपलब्ध करुन देणे

- महिला उत्पादित मालासाठी शासकीय व खासगी बाजारपेठ निर्माण करुन देणे

- विधवा व अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या निवासस्थानाचा काही भाग नोकरदार महिलांसाठी ‘सावित्रीबाई फुले कामगार वसतिगृह’ म्हणून देण्याचे नियोजन

- महाराष्ट्र सरकाऱच्या ‘लेक लाडकी’ योजनेप्रमाणे महापालिकेमार्फत तेवढीच रक्कम देण्यात येणार

दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत -

- शहरातील सर्व दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करणे

- ० ते ६ वयाोगटातील मुलांचे ‘लकवकर निदान व लवकर उपचार’साठी प्रणाली विकसीत करणे

- शहरातील सर्व दिव्यांग नागरिकांसाठी थेरपी युक्त, समुपदेशन केंद्र व सर्व उपचार केंद्र

- सेन्सरी गार्डनसह सर्व सोई-सुविधा युक्त राज्यातील पहिले दिव्यांग भवन

- शहरातील विशेष मुलांसाठी निरामय आरोग्य योजनेच्या विम्याची रक्कम महापालिकेमार्फत अदा करणार

- महापालिका हद्दितील दिव्यांग नागरिकांसाठी सक्षमीकरण, सामाजिक समावेशन करण्यासाठी प्रगत प्रशिक्षण

मागासवर्गीय कल्याणकारी योजने अंतर्गत -

- शहरातील युवक, युवतींना देशांतर्गत, परदेशी शिक्षणासाठी अर्थसहाय्य

- इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

- मागासवर्गीय युवक, युवतींना विविध व्यवसाय, प्रगत प्रशिक्षण

- मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेसाठी पुस्तक संच वाटप

- शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी सायकल वाटप

अन्य कल्याणकारी योजने अंतर्गत -

- जेष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक दिनाचे आयोजन

- जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात उपयोगी वस्तूंचे वाटप

- तृतीयपंथी आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन

- वय वर्षे ५० वरील तृतीय पंथीयांना पेन्शन व रोजगार उपलब्ध करुन देणे

- बेघर निवारा केंद्रात सहाय्य

- १० वी व १२ वीच्या शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक बक्षिस रक्कम

- शहरातील एचआयव्ही बाधीत मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांना, संस्थांना अर्थसहाय्य

- शहरातील १८ ते ३५ वयोगटातील युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण देऊन ‘लाईट हाऊस’ रोजगार निर्मिती उपक्रम

- शहरात २ लाईट हाऊस प्रकल्प कार्यान्वयित

- शहरात ६ लाईट हाऊस प्रकल्प प्रस्तावित