पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णाच्या आहारासाठी प्रतिदिन मोजते एवढे पैसे; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

तीन चपात्या, सुकी व पातळ भाजी, उसळ, भात, सलाड व फळ हा सकस आहार कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना दिला जात आहे. त्यासाठी महापालिका प्रतिरुग्ण २५० रुपये मोजत आहे. यात सकाळी नाश्‍ता, दुपारी व सायंकाळी जेवण दिले जात आहे.

पिंपरी - तीन चपात्या, सुकी व पातळ भाजी, उसळ, भात, सलाड व फळ हा सकस आहार कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना दिला जात आहे. त्यासाठी महापालिका प्रतिरुग्ण २५० रुपये मोजत आहे. यात सकाळी नाश्‍ता, दुपारी व सायंकाळी जेवण दिले जात आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह अकरा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण दाखल आहेत. संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळल्यानंतर सुरुवातीला १४ दिवस उपचार केले जात होते. गेल्या महिन्यापासून केंद्र सरकराच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सात दिवस उपचार केले जात आहेत. सध्या कुठलीही लस नसल्याने रुग्णांना सकस आहार व प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे दिली जात आहेत. सकस आहार पुरविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट दिलेले आहे.

No photo description available.

अन्नपदार्थ पॅकिंग बॉक्‍स खर्च
अन्नपदार्थ पॅकिंगसाठी प्रतिबॉक्‍स तेरा रुपये खर्च आला आहे. रुग्णाला प्रतिदिन दोन वेळा जेवण म्हणजेच दोन बॉक्‍सचा खर्च २६ रुपये. एका रुग्णावर १४ दिवस उपचार, त्यामुळे किमान खर्च एक हजार ६६ रुपये. सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बरे झालेल्या रुग्णाला सातव्या दिवशी डिस्चार्ज मिळत आहे. म्हणजे सात दिवस भोजन खर्च करावा लागत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation charges the same amount per day for the patients diet