esakal | कोरोना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केली 78 कोटींची उभारणी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केली 78 कोटींची उभारणी
  • वेगवेगळ्या कामातून वर्ग करणार रक्कम 

कोरोना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने केली 78 कोटींची उभारणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, त्यासाठी निधी कमी पडत आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारने अनुदानाची मागणी केली आहे. तूर्त खर्च भागविण्यासाठी अर्थसंकल्पातील अन्य कामांच्या खर्चातून रक्कम वर्ग केली जाणार आहे. त्या माध्यमातून सुमारे 78 कोटी रुपये कोरोनासाठी उपलब्ध होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका आठ रुग्णालये व 28 दवाखान्यांच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करीत आहे. तसेच, वायसीएम, नवीन भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालयात उपचार केले जात आहेत. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन व पीएमआरडीएच्या मदतीतून नेहरूनगर येथे आणि स्वतःच्या निधीतून ऑटो क्‍लस्टर येथे जम्बो रुग्णालय आणि 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामुळे खर्च वाढला आहे. ऑक्‍सिजन व व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था केली आहे. भविष्यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. शिवाय, अर्थसंकल्पाच्या केवळ 33 टक्के खर्च करण्याचा सरकारचा आदेश आहे. त्यामुळे पाच हजार दोनशे कोटींच्या अर्थसंकल्पातून साधारणतः सतराशे कोटी रुपयेच खर्च करावा लागणार आहे. आतापर्यंत जवळपास तेराशे कोटीपर्यंत खर्च झाला आहे. केवळ चारशे कोटी रुपयेच शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेने राज्य सरकारकडे अनुदान मागितले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सरकारचे अनुदान मिळण्यास विलंब होऊ शकतो, या पार्श्‍वभूमीवर तातडिची गरज म्हणून अन्य कामांच्या तरतुदीमधून काही रक्कम वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार सुमारे 78 कोटी रुपये कोरोनावर खर्च करण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा उपलब्ध होईल निधी 

  • लेखाशीर्ष/रक्कम 
  • प्रभागस्तरीय आठ कामे/7 कोटी 
  • 21 रस्त्यांची कामे/21 कोटी 
  • वाहतूक सुधारणा 14 कामे/25 कोटी 
  • स्मार्ट सीटीतील कामे/25 कोटी 
  • एकूण रक्कम/78 कोटी