पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार पवना पुनरुज्जीवन प्रकल्प 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

हरित लवादाच्या आदेशानुसार मुळा व पवना नद्यांच्या सीमा निश्‍चित करून प्रवाहातील अडथळे काढण्यात येणार आहेत.

पिंपरी : मुळा व पवना नद्यांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा, पात्रातील राडारोडा व प्रवाहाला अडथळा ठरणारी बांधकामे काढावीत, अन्यथा एक कोटी रुपये दायित्व द्यावे लागेल, असा आदेश हरित लवादाने महापालिकेसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिला आहे. त्यानुसार महापालिका पवना नदी पुनरुज्जीवन  प्रकल्प राबविणार आहे. 

पवना जलवाहिनीचे काम पुन्हा सुरू होणार 

हरित लवादाच्या आदेशानुसार मुळा व पवना नद्यांच्या सीमा निश्‍चित करून प्रवाहातील अडथळे काढण्यात येणार आहेत. त्यासाठी महापलिका बांधकाम परवानगी विभागाने नदीपात्रात भराव टाकणाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. त्यांनी भराव न काढल्यास महापालिका स्वतः भराव काढून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करणार आहे. या बाबतची आढावा बैठक घेऊन आयुक्तांनी भराव काढण्यासाठी निविदा काढण्याची सूचना केली आहे. 

हरित लवाद म्हणतंय... 
- नद्यांच्या प्रतिबंधित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे काढा 
- निवासी, औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडा 
- नद्यांच्या सीमा निश्‍चित करून कृती आराखडा सादर करा 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation to implement pavana revitalization project