कोरोनाविषयीच्या प्रश्नांसाठी आता 'टेलिमेडिसीन'; पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार घरबसल्या मार्गदर्शन 

कोरोनाविषयीच्या प्रश्नांसाठी आता 'टेलिमेडिसीन'; पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार घरबसल्या मार्गदर्शन 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'पीसीएमसी स्मार्ट सारथी' या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी 'मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ- टेलिमेडिसीन' ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधा ॲपचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (शनिवार) झाले.

महापालिका भवनातील कोरोना वॉररूममध्ये कार्यक्रम झाला. आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका, इंडस इंड बँक आणि 'सकाळ रिलीफ फंड' यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ- टेलिमेडिसीन' ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांचा ताप, खोकला, थकवा, वेदना इत्यादी  लक्षणांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नावली अॅपमध्ये आहे. संबंधित नागरिकाने किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याने कुठे कुठे प्रवास केला आहे. इत्यादी माहिती ॲपमध्ये संकलित केली जाणार आहे. सदर माहितीचे विश्लेषण करून नागरिकांना कोरोनाचा कितपत धोका आहे, याची माहिती दिली जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

या टेलिमेडिसीन सुविधेचा उपयोग करून नागरिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्लादेखील घेऊ शकतात. नागरिकांनी ॲपच्या माध्यमातून डॉक्टरांची वेळ घेतल्यानंतर त्या वेळेमध्ये नागरिक डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत. यामुळे नागरिकांना घरबसल्या योग्य  मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरोना साथीमुळे घराबाहेर पडता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये घरातच राहून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. महापालिका, इंडस इंड बँक आणि 'सकाळ रिलीफ फंड' यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com