फोटोग्राफी करणाऱ्यांनो, पिंपरी-चिंचवड महापालिकेनं 'या' स्पर्धेचं आयोजन केलंय

फोटोग्राफी करणाऱ्यांनो, पिंपरी-चिंचवड महापालिकेनं 'या' स्पर्धेचं आयोजन केलंय

पिंपरी : जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेने 7 ते 17 ऑगस्टदरम्यान 'कोरोना सोबत जगताना' या विषयावरील फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा विनामूल्य असून, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. 

दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या प्रदुर्भामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडलेला आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मर्यादित प्रवाशांसह वाहन प्रवास करणे, मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यालयीन कामकाज करणे आदी बाबींचा दैनंदिन जीवनामध्ये नव्याने समावेश झाला आहे. कोरोनासोबत जगताना दैनंदिन जीवनामध्ये आलेल्या बदलांचे चित्रण स्पर्धकांच्या छायाचित्रांमधून दिसणे अपेक्षित आहे, असे या स्पर्धेचे परीक्षक प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पर्धेसाठी 21 वर्षाखालील, महिला व खुला असे तीन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकांसाठी दोन हजार रुपये व प्रशस्तीपत्रक आणि दोन उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये व प्रशस्तीपत्रक अशा स्वरुपाची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी कशाळीकर यांच्यासह महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त व आर्टिस्टकम फोटोग्राफर परीक्षक आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली छायाचित्रे info@pcmcindia.gov.in या ई-मेलवर संपूर्ण नाव, वय, पत्ता व मोबाईल क्रमांकासह 10 ते 17 ऑगस्टदरम्यान पाठवावीत. प्रिंट स्वरूपातील छायाचित्रे स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाहीत. एक स्पर्धक कमाल पाच छायाचित्रे स्पर्धेसाठी सादर करू शकेल. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारा प्रत्येक फोटो किमान दोन एमबी असावा. या स्पर्धेसाठी मोबाईल अथवा इतर कोणत्याही कॅमेराद्वारे काढण्यात आलेले फोटो पात्र राहतील. अधिक माहितीसाठी विलास साळवी : 8855892803 व खुशाल पुरंदरे : 9665875088 यांच्याशी संपर्क संपर्क साधावा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com