महापालिकेच्या खर्चातून नामफलक!

महापालिकेच्या खर्चातून नामफलक!

पिंपरी - महापालिकेतून होणाऱ्या खर्चामधून सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी विविध कार्यालयांमध्ये पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे नामफलक लावले आहेत. हे नामफलक लवकरात लवकर काढून टाकण्याची मागणी मनसेचे शहर सचिव रूपेश पटेकर यांनी केली आहे. याबाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. परंतु त्यांनी कधीही पक्षाच्या झेंड्याचा रंग किंवा चिन्हाचा महापालिकेच्या कार्यालयात नामफलकावर वापर केला नाही. आता महापालिकेत भाजपची सत्ता आहे. शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक सदस्य, स्थायी समिती सदस्य, विधी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समित्यांमधील नामफलक पक्षाच्या झेंड्याच्या रंगाचे बनविले आहेत. महापालिकेच्या सर्व फलकावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे परिचय चिन्ह असणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या अटी, शर्तीनुसार शिवाजी महाराजांचा यांचा परिचय चिन्हाचा समितीच्या सभापती व सदस्यांच्या या नामफलकावर कुठेही वापर केला नाही. त्यामुळे लवकरात लवकर नामफलक काढून टाकावेत. महापालिकेच्या नियमानुसार पूर्वीप्रमाणे फलक लावावेत. 

गेल्या दोन वर्षांपूर्वी सत्ताधारी पक्षाने झेंड्याच्या रंगांच्या निवासस्थानाचे फलक बनविले होते. पण आयुक्‍तांच्या आदेशानुसार त्या नगरसेवकांच्या नामफलकाच्या पाट्या स्थापत्य विभागाकडून काढून टाकण्यात आल्या होत्या. अशाच प्रकारे हे नामफलक बदलावेत, अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. निवेदनावर नगरसेवक सचिन चिखले, हेमंत डांगे यांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com