कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची ही 'जम्बो फॅसिलिटी'

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची ही 'जम्बो फॅसिलिटी'

पिंपरी : जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटली आहे. मात्र, खबरदारी म्हणून महापालिकेने 'जम्बो फॅसिलिटी' (रुग्णालय) तत्व अवलंबून रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. त्या अंतर्गत एक हजार 425 बेडची सुविधा तीन ठिकाणी उपलब्ध होणार आहे. 

अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी जुलैमध्ये विशेष लॉकडाउन पाळण्यात आला. त्या कालावधीत रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. सर्वाधिक एक हजार 201 रुग्ण 22 जुलै रोजी आढळले. या महिन्यात 18 हजार 338 रुग्ण आढळले. त्यांच्यावर महापालिकेसह खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात आले. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्ण संख्या घटली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात 25 ते 31 जुलै दरम्यान चार हजार 72, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अर्थात एक ते सहा ऑगस्ट दरम्यान अवघे दोन हजार 573 रुग्ण आढळले. आता जम्बो फॅसिलिटीअंतर्गत ऑक्‍सिजन बेडचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठीची यंत्रणा उभारणीचे काम सुरू असून, दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. याचा पन्नास टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे. सहा महिने कालावधीसाठी ही सुविधा असेल. 

जम्बो फॅसिलिटी ठिकाणी बेडची संख्या

  • ऑटोक्‍लस्टर : 200 
  • मगर स्टेडियम : 800 
  • बालनगरी पिंपरी : 425 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दृष्टिक्षेपात... 

महिना........रुग्ण........बरे........मृत्यू 
मार्च............15..........9............- 
एप्रिल.........102.......33...........3 
मे...............454.......220..........5 
जून...........3504......1600.......39 
जुलै.........18338......10713....288 
ऑगस्ट.....2573........5106......102 
एकूण.......24986......17681.....437 
(सहा ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत) 

कोरोना रुग्ण संख्या वाढीची परिस्थिती सध्या आटोक्‍यात आहे. प्रभाग स्तरावरील वॉररूमद्वारे रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवले जात आहे. खबरदारी म्हणून 'जम्बो फॅसिलिटी' रुग्णालय ऑटो क्‍लस्टर, मगर स्टेडियम व बालनगरी या ठिकाणी सुरू करीत आहोत.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com