
एकीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत असून आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली आहे.
Pimpri NCP Office : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला कुलूप
पिंपरी - एकीकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत असून आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयाला सकाळपासूनच कुलूप असल्याचे दिसून येत असून एकही कार्यकर्ता अथवा पदाधिकारी कार्यालयाकडे फिरकला नसल्याचे दिसते. तसेच भाजपचे कार्यालय सुरु असून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी मतमोजणीच्या ठिकाणी असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.
सध्याच्या राजकीय घडामोडींवरून या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. तिरंगी लढतीत कोण विजयी होणार याबाबतची अनेकांना उत्सुकता होती. अखेर गुरुवारी सकाळपासूनच निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही फेऱ्यातच भाजपच्या अश्विनी जगतात व राष्ट्ररवादि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. अद्यापही काही फेऱ्या बाकी आहेत.
दरम्यान, पिंपरीतील मोरवाडी येथील भारतीय जनता पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय नेहमीप्रमाणे सकाळपासूनच सुरु आहे. येथे काही कार्यकर्ते असून इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मजमोजणीच्या ठिकाणी आहेत.
तसेच, पिंपरीतील खराळवाडी येथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाला कुलूप असून येथे कोणीही उपस्थित नसल्याचे दिसून येते.