पोलिस आयुक्त मैदानात उतरल्याने सामान्यांना दिलासा;कर्मचारी कोमात

पोलिस आयुक्त मैदानात उतरल्याने सामान्यांना दिलासा;कर्मचारी कोमात

पिंपरी - एकीकडे एखादी मोठी घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्त घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: तातडीने घटनास्थळी दाखल होत असून, परिस्थिती हाताळत आहेत. यामुळे अधिकाऱ्यांवर वचक बसण्यासह तपासालाही वेग येतो. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस आयुक्त मैदानात उतरत असल्याने सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळत आहे. दुसरीकडे मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे प्रमुखांसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही झटून काम करणे आवश्‍यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने तोडफोडीच्या घटनांसह इतर गंभीर घटना शहरात घडत आहेत. यावरून आयुक्त जोमात अन्‌ अधिकारी, कर्मचारी कोमात, अशी स्थिती पिंपरी-चिंचवड पोलिस दलात पाहायला मिळत आहे.  

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताच शहरातील कायदा-सुव्यवस्था कायम राखण्याच्या दृष्टीने पावले उचलली. गस्त वाढविण्यासह, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची वेळोवेळी तपासणी करणे, कोम्बिंग ऑपरेशन करणे, नाकाबंदी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बाबींचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. तरीही काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अद्यापही टोळक्‍यांकडून राडा घालणे सुरूच आहे. यामुळे अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, घटनास्थळी आयुक्तांनी भेट देत सूचना दिल्यानंतर तातडीने आरोपींना ताब्यात घेण्यासह तपासाची सूत्रे हालतात. मात्र, घटना घडू नये यासाठीही पोलिसांनी उपाययोजना राबविणे आवश्‍यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मोहननगर येथे वाहन तोडफोडीची घटना घडल्यानंतर पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. काही क्षणातच सर्व सूत्रे हलल्याने स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

आयुक्तांनी सामान्य नागरिकांना भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यासह फोन क्रमांकही जाहीर केला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास ते थेट आयुक्तांकडे जात आहेत. यामुळे आता स्थानिक पोलिस ठाण्यात नागरिकांना काही प्रमाणात वेगळा अनुभव येत असून आयुक्तांकडे येणाऱ्या तक्रारींचेही प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्याबाबत ठाणे प्रमुखांनाही त्यांनी वेळावेळी सूचना दिल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयुक्तांची घटनास्थळी धाव 
पोलिस आयुक्त म्हटले की प्रमुख या नात्याने अधिकाऱ्यांकडून काम करून घ्यायचे, अशी पद्धत रूढ आहे. मात्र, सध्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे स्वत: मैदानात उतरून काम करीत आहेत. ३१ ऑक्‍टोबरला पिंपरीतील नेहरूनगरमध्ये टोळक्‍याने वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविली. तसेच, ३१ डिसेंबरला चिंचवडमधील मोहननगर येथेही अशीच घटना घडली. या ठिकाणी आयुक्तांनी भेट देत घटनेचा आढावा घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. यासह इतर घटनेच्या ठिकाणीही आयुक्तांनी भेट देत घटनेचा आढावा घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com