SSC Exam Result : पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९६.७२ टक्के; मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने मार्च २०२३ मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) दुपारी एक वाजता जाहीर झाला.
Maharashtra SSC Result 2023
Maharashtra SSC Result 2023 sakal

पिंपरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वतीने मार्च २०२३ मध्ये घेतल्याला दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) दुपारी एक वाजता जाहीर झाला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे.

यंदा ऑफलाइन परीक्षा झाल्यामुळे निकालाविषयी उत्कंठा दाटली होती. मुला व मुलींनीही निकालात अव्वल बाजी मारली. मुलांचा निकाल ९५.५६टक्के तर मुलींचा निकाल ९८.०५ टक्के लागला आहे.

शहरातुन दहावीच्या परीक्षेला एकूण १९२८२ विद्यार्थी बसले होते. यामध्ये १०२५६ मुले व ८९७६ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यातून ९८०१ मुले व ८८०१ मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण १८६०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील तब्बल ११८ शाळांनी निकालाची शंभरी गाठली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com