पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात

पोलिसांवरील हल्ले थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील पाच महिन्यात तब्बल ४३ घटना घडल्या.
Attack on Police
Attack on PoliceSakal

पिंपरी - पोलिसांवरील (Police) हल्ले (Attack) थांबत नसल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील पाच महिन्यात तब्बल ४३ घटना (Happen) घडल्या. कारवाईला विरोध करीत हुज्जत घालणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. (Pimpri Chinchwad the Security of the Police is in Danger)

कायदा-सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिस अहोरात्र झटत आहेत. मात्र, कर्तव्यावर असताना वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांचा त्यांना सामना करावा लागत आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करताना उल्लंघन करणारेच पोलिसांशी हुज्जत घालतात. त्यांच्यावर हात उचलण्यापर्यंत काहींची मजल जाते. यामध्ये कर्मचारी जखमीही झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पाच दिवसांपूर्वी वाकड येथे नाकाबंदीच्या ठिकाणी दुचाकीस्वाराला थांबण्यास सांगितले असता, त्याने बंदोबस्तावरील पोलिसाला फरफटत नेले.

Attack on Police
अनधिकृत होर्डिंगना बसला चाप! लॉकडाउनचा परिणाम

सहा महिन्यांपूर्वी चिंचवडगावात एका वाहतूक पोलिसाला तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ५ मे रोजी डुडुळगाव येथे तिघांनी पोलिसांशी झटापट करीत त्यांच्या अंगावर धावून गेले, तर १२ मे रोजी मुळशी तालुक्यातील नेरे येथे दारू भट्टीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर महिलांनी दगडफेक केली. ही घटना ताजी असतानाच जुनी शुक्रवारी (ता. ४) पहाटे सांगवी येथे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर अंधारात लपून बसलेल्या चोरट्यांनी दगडफेक केली. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाले.

वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येते. चालू वर्षाच्या पाच महिन्यात पोलिसांवरील ४३ घटना घडल्या आहेत.

धाक कमी होतोय ?

पूर्वी पोलिसाने केवळ आवाज दिला, तरी कायदा मोडणाऱ्यांना घाम फुटायचा. मोठ्या आवाजात बोलून हुज्जत घालणे तर दूरच. मात्र, सध्या पोलिसांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली आहे. यावरून पोलिसांचा धाक कमी होतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Attack on Police
चुका कारभाऱ्यांच्या; दोष अधिकाऱ्यांना अशी आहे पालिकेतील स्थिती

हल्ल्याच्या घटना

५ जानेवारी

११ फेब्रुवारी

८ मार्च

१६ एप्रिल

३ मे

४३ एकूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com