पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कोरोनामुळं पहिला मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील संतोष झेंडे (वय 46) यांचा रविवारी (ता. 30) कोरोनामुळे मृत्यू झाला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील संतोष झेंडे (वय 46) यांचा रविवारी (ता. 30) कोरोनामुळे मृत्यू झाला. ते चाकण वाहतूक विभागात कार्यरत होते. पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे. 

कौतुकास्पद : भटक्‍या कुत्र्यांसाठी 'ते' ठरतायेत अन्नदाते 

झेंडे यांना चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोनाची तपासणी केली. तेव्हा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. झेंडे यांनी मुंबई पोलिस दलासह पुणे शहर, पुणे वाहतूक विभाग, पिंपरी, भोसरी एमआयडीसी येथे सेवा बजावली. तर सध्या ते चाकण वाहतूक विभागात कार्यरत होते. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस दलात अद्यापपर्यंत 324 अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यापैकी अडीचशेहून अधिक अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून, काही जण ड्युटीवरही हजर झाले आहेत. 

Image may contain: 1 person, standing and outdoor
संतोष झेंडे

मुळशी, पवनाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांचा चुकतोय काळजाचा ठोका

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात चिंतेचे वातावरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad traffic police death due to covid 19