esakal | Pimpri: महापालिकेचा ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी : महापालिकेचा ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘माझी मिळकत, माझी आकारणी’ योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत स्वयंघोषणेद्वारे मिळकतीची स्वत:हून नोंद करणाऱ्या नागरिकांना सामान्यकरात ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी केले आहे.

कोरोनाकाळात अनेक ठिकाणी नव्याने बांधकामे करण्यात आली आहेत. पण त्यांची नोंद अद्याप महापालिकेकडे केलेली नाही. अशा मिळकत गुपित ठेवणाऱ्यांसाठी ही योजना आहे.त्या मालमत्ताधारकांनी स्वतःहून महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज करावा.

हेही वाचा: पुणे : भाच्यांकडून वृद्ध मामा-मामीला जबर मारहाण

या योजनेबाबत महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकतधारकांनी स्वतःचा व मिळकतीचा तपशील नमूद केल्यानंतर मिळकतीचे संभाव्य बिलाची रक्कम तत्काळ माहिती होणार आहे. ज्या नवीन व वाढीव मिळकतीची नोंद झाली नसल्यास ती नागरिकांनी स्वतःहून करावी. ही सवलत सन २०२१-२२ या एकाच वर्षांसाठी मिळणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

loading image
go to top