अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळली खंडणी

दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
pimpri crime update threatening obscene photos viral demand ransom
pimpri crime update threatening obscene photos viral demand ransomsakal

पिंपरी : अश्लील फोटो व्हायरल करण्याची व बदनामी करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या दोघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी एक महिला व एका पुरुषावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी मसाज करण्यासाठी रूमवर आलेल्या अनोळखी महिलेस मसाज करण्यासाठी नकार दिला असता, त्या महिलेने दुसऱ्या पुरुषाला फोन लावला.

त्याने फिर्यादी यांना आता पाच हजार रुपये दे नाहीतर तेथे येऊन आरडाओरडा करील, शिव्या देईल, तुझी इज्जत काढील, अशी धमकी देत पाच हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादीसह त्यांच्या पत्नीचा अशील फोटो तयार करून फिर्यादीच्या व्हॉट्सअपवर पाठवला. त्यानंतर फिर्यादी यांना फोन करून पैसे दे नाहीतर तुझे व तुझ्या पत्नीचे फोटो फेसबुकवर व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार पिंपरीतील हॉटेल कीज येथे घडला. याप्रकरणी आरोपींवर पिंपरी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com