Sun, June 4, 2023

साफसफाई काम करणाऱ्या महिलेने पगाराचे पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण केली आहे.
Pimpri Crime : साफसफाईच्या कामाचे पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण
Published on : 21 March 2023, 4:12 pm
पिंपरी - साफसफाई काम करणाऱ्या महिलेने पगाराचे पैसे मागितल्याने महिलेला बेदम मारहाण केली आहे. ही महिला अक्षरशः रक्तबंबाळ झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हर्षद कमाल खान असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचा भाऊ अमजद याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून पिडीत महिला येथे साफसफाईचे काम करायची. या महिलेचा पगार थकला होता.
दरम्यान, महिलेने पगाराचे पैसे मागितले असता यावरून हर्षद व महिला यांच्यात बाचाबाची झाली. यामध्ये हर्षदने महिलेला बेदम मारहाण केली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.