संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीच्या मित्राची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

खराळवाडी येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या मित्रानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार खराळवाडी येथे शुक्रवारी घडला.

Pimpri Crime : संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीच्या मित्राची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी - खराळवाडी येथील तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर तिच्या मित्रानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार खराळवाडी येथे शुक्रवारी घडला. पाठोपाठ घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

पिंपरीतील खराळवाडी येथील तरुणी मंगळवारी रात्री येरवडा येथील कल्याणीनगर येथे गेली होती. तेथे एका इमारतीच्या खाली तिचा मृतदेह आढळला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

त्यानंतर गुरुवारी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी खराळवाडी येथे आणला असता इतर नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी करीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी नातेवाईक तरुणीचा मृतदेह घेऊन येरवडा पोलिस ठाण्यात गेले.

दरम्यान, तरुणीच्या घराशेजारी राहणाऱ्या तिच्या मित्रानेही गळफास घेऊन आत्महत्या केली.