पिंपरी : औद्योगिक वसाहतीतील कंत्राटी कामगार बोनसपासून वंचित

पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव औद्योगिक कंपन्यांमध्ये लाखो तरुण व महिला आणि स्थलांतरित कामगार विविध कंपन्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत.
Bonus
BonusSakal

पिंपरी - पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव औद्योगिक कंपन्यांमध्ये लाखो तरुण व महिला आणि स्थलांतरित कामगार विविध कंपन्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. कोरोना काळात औद्योगिक उत्पादन चक्र चालवण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या बहुतांशी कामगारांना ऐन सणासुदीच्या तोंडावर बऱ्याच उद्योजकांनी बोनस नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे.

सूक्ष, मध्यम व लघु उद्योगांमध्ये दरवर्षी नवरात्र आणि दसऱ्याच्या काही दिवस आधी या कामगारांना उत्पादन कमी झाल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात घरी बसवले जात आहे. विविध औद्योगिक उत्पादनांची सर्वांत जास्त विक्री दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर होत आहे. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल ई उत्पादनातील मोठ्या कंपन्यांमध्ये विविध उत्पादनात कंत्राटी संस्थांच्या माध्यमातून तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम पुरवठादार एका पेक्षा अधिक कंत्राटी संस्थांमार्फत कामगारांकडून काम करून त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम देऊन वर्षाचे उत्पादन काढून घेतले जाते आहे. या कामगारांना तोंडी आदेश देऊन कंत्राटदाराने घरी बसविले आहे.

श्रमिक चळवळीतील कार्यकर्ते क्रांतिकुमार कडुलकर म्‍हणाले, ‘‘शहरातील कामगार संघटनांच्या नेत्यांनी २०२०-२१ मध्ये कामावरून कमी केलेल्या आणि बोनस नाकारलेल्या असुरक्षित आणि असंघटित कंत्राटी कामगारांचे मेळावे घ्यावेत. त्यांना संघटित करून दिलासा द्यावा.’’

Bonus
Corona Update : पिंपरी-चिंचवडमध्ये ४७ नवीन रुग्ण

कायदा काय सांगतो...

पेमेंट ऑफ बोनस अधिनियम १९६५ नुसार कारखान्यांमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कामावर ठेवण्यात आलेले असतील तर त्या सर्व कामगारांना किमान ८.३३ दराने किंवा अधिनियमानुसार २० टक्क्यांपर्यंत बोनस देणे सर्व नियोक्त्यांना तसेच कंत्राटी एजन्सींना बंधनकारक आहे. सर्व कारखान्यांना व आस्थापनांना, त्यांनी नफा मिळवण्यास सुरुवात केलेले वर्ष किंवा त्यांच्या व्यवसायाचे सहावे वर्ष, यांपैकी जे काही आधी असेल, त्या वर्षापासून हा अधिनियम लागू आहे. या अधिनियमात सेट ऑन व सेट ऑफ या योजनेशी निगडीत असलेला बोनस देण्याची देखील तरतूद आहे. किमान ८.३० टक्के दराने उत्पादकतेशी निगडीत बोनस देण्याचीही तरतूद आहे. बोनस देणे बंधनकारक करणारी यंत्रणा उभी करण्याच्या तरतुदी देखील आहेत. शिकाऊ उमेदवार वगळता ७५०० रुपये पेक्षा कमी वेतनावर कामावर ठेवलेले सर्व कामगार बोनस मिळण्यास पात्र होतात. जे कामगार कंपन्यांच्या आवारात हिंसक वर्तन, चोरी, कोणत्याही मालमत्तेशी घातपात या कारणांवरून कामावरून कमी करण्यात आलेले असतील, असे कामगार बोनस मिळवण्यास पात्र नाहीत. पात्र होण्यासाठी कामगाराने एका आर्थिक वर्षामध्ये आस्थापनेची किमान ३० दिवसांची सेवा करणे अधिनियमानुसार आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com