पिंपरी : निवडणूक ‘फिव्हर’चा पोलिसांना ‘ताप’

शहरातील स्थिती; प्रस्थापित व इच्छुकांतील वादाच्या पोलिसांत तक्रारी
election
electionsakal

पिंपरी : निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय वातावरण तापत आहे. नागरिकांसाठी आपणच काहीतरी करतोय हे दाखविण्याचा इच्छुकांकडून प्रयत्न केला जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या कारणावरून प्रस्थापित व इच्छुकांमध्ये होणारे वाद, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी हुज्जत असे प्रकार घडत असून पोलिस ठाण्यापर्यंत तक्रारी जात आहेत. प्रसंगी इच्छुक कायदा हातात घेण्यासही मागे पुढे पाहत नसल्याचे दिसून येते. महापालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्यान, पक्षबदल, पक्ष प्रवेश सध्या जल्लोषात सुरू आहेत. एकेकाळचे एकनिष्ठ, कट्टर पदाधिकारी, कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. ‘निवडून येण्यासाठी वाट्टेल ते,’ अशा पद्धतीने सध्या इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. इच्छुकांचे वाढदिवस भव्य स्वरूपात साजरे होऊ लागले असून सणावाराच्यां शुभेच्छाही मतदारांना घरपोच दिल्या जात आहेत. या माध्यमातून नागरिकांसाठी आपणच काहीतरी करतोय! हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

election
युपीएससी परीक्षेत विदर्भाच्या विद्यार्थ्यांचे यश

मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यासह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी घरापर्यंत पोहोचत आहेत. मात्र, यातून वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. राजकीय ईर्षेतून आरोप-प्रत्यारोप वाढू लागले आहेत.

ठराविक भागात कार्यक्रम घेण्यावरूनही वाद होऊ लागले आहेत. अद्याप निवडणुकीला अवधी असतानाच असे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे यापुढील काळातही राजकीय कारणावरून अथवा इतर कारणावरून झालेले वाद सामंजस्याने न मिटविल्यास प्रस्थापित व इच्छुक पोलिस ठाण्यात दिसू शकतात.

घटना : १

भोसरी परिसरात एकाने ‘आमच्या भागात राजकीय कार्यक्रम घेऊ नको, घेतल्यास संपवून टाकीन, बाईच्या केसमध्ये अडकवेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

घटना : २

काही दिवसांपूर्वी एका महिला लोकप्रतिनिधीने प्रभागातील समस्येवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राडा घातला. यावरून गुन्हा दाखल होऊन पदाधिकारी महिलेला अटकही झाली होती.

घटना : ३

अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होतो आणि संथगतीने काम चालू आहे, या कारणावरून निगडीतील एका नगरसेवकाने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला गेल्या महिन्यात घेराव घालून शाई फेकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com