esakal | घबाडषष्टीनिमित्त पिंपरी फूल बाजार सजला 
sakal

बोलून बातमी शोधा

घबाडषष्टीनिमित्त पिंपरी फूल बाजार सजला 
  • कार्तिक शुक्‍ल षष्ठीला हा सण फुलांच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठा आनंद अन्‌ उत्साह असतो.

घबाडषष्टीनिमित्त पिंपरी फूल बाजार सजला 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : फुलांच्या व्यापाऱ्यांचा सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळीनंतर येणारी घबाडषष्ठी. कार्तिक शुक्‍ल षष्ठीला हा सण फुलांच्या व्यापाऱ्यांमध्ये मोठा आनंद अन्‌ उत्साह असतो. यानिमित्त दुकानेही फुलांनी सजविण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अनेक वर्षापासून घबाडषष्ठीला लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आहे. पिढ्यान्‌पिढ्या आम्ही घबाडषष्ठीला लक्ष्मीपूजन करतो, असे सांगत होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभागप्रमुख राजू शिंदे. एरवी लोकांची घरे, दुकाने आणि कार्यालये सजवणारी फुलांची दुकाने आज स्वतः:च सजली होती. बहुतांश फूल व्यापाऱ्यांनी दुकानांची फुलांनी अतिशय सुंदर व आकर्षक सजावट केली होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फूल बाजाराचे अध्यक्ष राजकुमार मोरे म्हणाले, "दिवाळीत कामात खूपच व्यस्त असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर फूल व्यापारी संघटनेने यंदाही घबाडषष्ठी एकत्र साजरी केली. दुकानाची पूजा करून कामगारांना व ग्राहकांना मिठाई वाटप केले.'' कामगारांना बोनसही दिला. सर्वांनी मिळून दुकानासमोर फटाके वाजवून आनंद साजरा केला. ऊस, साळीच्या लाह्या, बत्तासे यांच्या नैवेद्यही दाखविण्यात आला. पिंपरी फूल बाजार आडत संघ सणासुदीला काळात मोठ्या प्रमाणात ग्राहक यावेत, अशी प्रार्थना करीत आपापल्या गाळ्यांचे पूजन केले. दुकानातील वजनकाटा, वह्या, हिशोब पुस्तिका, सर्व साहित्याची पूजा केली. सत्यनारायण महापूजा घातली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी उपस्थित मातोश्री सप्तश्रृंगी पुष्प भांडार गाळ्याचे मालक गणेश आहेर, उपाध्यक्ष दत्तात्रेय फुले, शिवाजी सस्ते, संजय बोडके, बाबा रासकर, मीनाताई आहेर, सुनील काळे, दत्तात्रेय ठक्कर, राक्षे मामा, अजय हांडबर, बाळू वाघुले, विश्‍वास तापकीर, अनंता फुले, अजित तापकीर, संतोष कदम, श्‍याम मांडगे, किरण जाधव, नितीन रासकर उपस्थित होते.