esakal | Pimpri : शहरात ‘महाराष्ट्र बंद’ ला चांगला प्रतिसाद शहरात
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : शहरात ‘महाराष्ट्र बंद’ ला चांगला प्रतिसाद

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारणाऱ्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि मोदी सरकार विरोधात , महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र’ बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून मिरवणुक काढली. व्यापारीवर्गाने बंदला विरोध केलेला नाही,मात्र नवरात्रीचा उत्सव असल्याने अर्थकारण बिघडू नये, यासाठी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र रस्त्यावर रहदारी कमी होती. तिन्ही पक्षांनी बंद शांततेत करावा,कोणताही अनुचित प्रकार होणार नाही,यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते.

निगडी, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठल वाडी, पिंपरी, चिखली, भोसरी, तळवडे, चिंचवडगाव, पिंपळे सौदागर, कासारवाडी, दापोडी, काळेवाडी या उपनगरात दुकाने सुरू होती. कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला संघर्ष महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली थरमॅक्स चौक(चिंचवड) ते पिंपरी अशा तीन किलोमीटरपर्यंत मोटार सायकल रॅली शहरातून काढण्यात आली. महाआघाडीच्या या बंदला शहरातील समाजवादी पक्ष,आम आदमी पक्ष,रिपब्लिकन पक्ष(जोगेंद्र कवाडे गट) सह इंटक,सिटू,आयटक यांनी पाठिंबा दिला.

पिंपरी चिंचवड, चाकण, तळवडे औद्योगिक परिसरात सर्व आस्थापने सुरू होती.

शहरातून जाणाऱ्या जुना मुबई बंगलोर महामार्ग आणि देहूरोड, वाकड, कात्रज बायपास नवीन महामार्गावर वाहनांची नियमित ये जा सुरू होती. काँग्रेस मधील नवीन शहराध्यक्ष निवडीमुळे नाराज स्थानिक नेतृवाने बंद मध्ये तटस्थता दाखवल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यात भारत बंदमध्ये सामील झालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बंद मध्ये सहभाग दिसला नाही.

loading image
go to top