
पिंपरी : पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी आरोग्य व स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.