esakal | पिंपरीतील गुलाबपुष्प उद्यान होणार ‘इंटरनॅशनल रोज गार्डन’ 

बोलून बातमी शोधा

पिंपरीतील गुलाबपुष्प उद्यान होणार ‘इंटरनॅशनल रोज गार्डन’ }

स्थायी समिती सभेत ऐनवेळचा विषय मंजूर; सल्लागाराची करणार नेमणूक 

पिंपरीतील गुलाबपुष्प उद्यान होणार ‘इंटरनॅशनल रोज गार्डन’ 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : गवळीमाथा-नेहरूनगर येथे महापालिकेचे गुलाबपुष्प उद्यान आहे. त्याचे रूप आता पालटणार आहे. लवकरच त्याचे रूपांतर ‘इंटरनॅशनल रोज गार्डन’मध्ये होणार आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास स्थायी समिती सभेने मान्यता दिली आहे. 

लोकहो, दंड भरण्यापेक्षा मास्क वापरा!

पिंपरी-चिंचवड : मिळकतकर अभय योजनेला मिळाली मुदतवाढ

अमेरिकेत जागतिक दर्जाचे रोजगार्डन विकसित केले आहे. जगभरातील विविध प्रजातींच्या गुलाबांचे जतन व संगोपन तिथे केले जाते. त्याप्रमाणेच गवळीमाथा-नेहरूनगर येथील गुलाबपुष्प उद्यानाला नवसंजीवनी दिली जाणार आहे. दरम्यान, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी गुलाबपुष्प उद्यानाबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिकेने गवळीमाथा नेहरूनगर येथे गुलाबपुष्प उद्यान सुरू केले आहे. मात्र, अनेक वर्षांपासून उद्यानाचा वापर केवळ साहित्य जमा करणे, उद्यान संबंधित टाकाऊ वस्तू किंवा खराब वस्तू जमा करण्यासाठी होत आहे. आजपर्यंत प्रशासनाने अनेक विकासकामे उद्यानात केली आहेत. पण, अद्यापही त्याला गुलाबपुष्प उद्यानाचे स्वरूप आलेले नाही. परिणामी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुलाब उद्यान म्हणून संबंधित उद्यानाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. त्यायाबाबत सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव मान्यतेसाठी होता, तो मंजूर केला आहे. 

महिला बचतगटांना प्रशिक्षण 
शहरात साधारण बारा हजार महिला बचत गट कार्यरत आहेत. महिलांना बचतीची सवय लागावी, गरजेच्या वेळी त्यांना त्वरित व कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, गटांनी उद्योग व व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, या उद्देशाने बचत गट कार्यरत आहेत. काही बचत गट एकत्र येऊन काही व्यवसाय करीत आहेत. पण ही संख्या खूपच कमी आहे. महापालिकेकडून बचतगटांना नियमित प्रोत्साहन दिले जाते. परंतु, या गटातील महिलांच्या बचत गटाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी गटांना, गटाविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर एक हजार बचतगटांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार दिवसांचा प्रशिक्षण कालावधी असेल. एका वेळी किमान शंभर महिला उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात यावी.