Sakal Vastu Expo 2023 : मनासारखं घर हवंय; १४ दिवस थांबा, एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्प उपलब्ध

उद्योगनगरीतील ३० हून अधिक विकसकांचे १५० हून अधिक प्रकल्पांमधील मोशी, चऱ्होली, चिखली, भोसरी, रावेत, ताथवडे, पुनावळे या परिसरातील घरांचे पर्याय इथे ग्राहकांना पाहता येतील.
Sakal Vastu Property Expo 2023
Sakal Vastu Property Expo 2023sakal
Summary

उद्योगनगरीतील ३० हून अधिक विकसकांचे १५० हून अधिक प्रकल्पांमधील मोशी, चऱ्होली, चिखली, भोसरी, रावेत, ताथवडे, पुनावळे या परिसरातील घरांचे पर्याय इथे ग्राहकांना पाहता येतील.

पिंपरी - कोरोनासारख्या कठीण काळावर आपण मात केलीय. पगार कपातीचं संकटही गेलंय. आता पगारवाढ झालीय. थोडाफार पैसा शिल्लक राहू लागलाय. क्रयशक्ती वाढलीय. स्वतःचं घर घेण्याची तुमची इच्छा आहे. पण, मनासारखं व बजेटमधलं घर शोधण्यासाठी पुरेसा वेळ नाही‌य. त्याची काळजी करू नका. फक्त १४ दिवस थांबा. कारण, एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांची माहिती देणारा व मनासारखं घर मिळवून देणारा ‘सकाळ वास्तु एक्स्पो २०२३’ येत्या १५ व १६ एप्रिल रोजी चिंचवड स्टेशन येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित केला आहे.

उद्योगनगरीतील ३० हून अधिक विकसकांचे १५० हून अधिक प्रकल्पांमधील मोशी, चऱ्होली, चिखली, भोसरी, रावेत, ताथवडे, पुनावळे या परिसरातील घरांचे पर्याय इथे ग्राहकांना पाहता येतील. प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. प्रथम ध्येय असतं, स्वत:चं शिक्षण पूर्ण करणं. ते झालं की बहुतांश जणांना हवी असते चांगली नोकरी. ती मिळाली की लग्न. लग्नानंतर मुलं, मुलांना चांगले शिक्षण. आणि त्यानंतर अर्थात चाळिशीत किंवा चाळिशीनंतर स्वतःचे घर. तेही मनासारखं. प्रशस्त. मनासारख्या ठिकाणी. पण, दररोजच्या धावपळीत मनासारख्या घराचा शोध घेण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ नसतो.

गृहप्रकल्पाची ठिकाणे वेगवेगळ्या भागात असल्यामुळे सर्वच ठिकाणी जाणे शक्य होत नाही. परिणामी इच्छा असूनही मनासारखं घर शोधण्यात अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी व घरांची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी ‘सकाळ’ने वास्तू एक्सपोचे आयोजन केले आहे. तर, सज्ज व्हा! आपल्या स्वप्नातील व मनातील घर बुक करण्यासाठी आजच दिवस निश्चित करा आणि घराचा मुहूर्त साधा.

घर घेण्यासाठी अनुकूल संधी

  • आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सरकारने रेडीरेकनरचे दर वाढवले नाहीत

  • रेडिरेकनरचे दर न वाढल्याने घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्काची जुन्या दरानेच आकारणी

  • रेडिरेकनर दर व मुद्रांक शुल्क वाढ नसल्याने घरांच्या किमती स्थिर राहतील

  • अनेकांची पगार वाढ होऊन क्रयशक्ती वाढल्याने बॅंकांकडून कर्ज सुविधा

सकाळ वास्तू एक्स्पोत काय?

  • शहर परिसरातील मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग

  • एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची माहिती मिळणार

  • वन बीएचकेपासून थ्री बीएचकेपर्यंत क्षेत्र असलेल्या घरांची माहिती मिळणार

  • मनासारख्या ठिकाणी मनासारखं घर निवडण्याची एकाच ठिकाणी संधी

  • घराबाबतच्या शंकांचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने

काय? कधी? कुठे? केव्हा?

  • काय? : ''सकाळ'' वास्तू एक्स्पो

  • कुठे? : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

  • कधी? : शनिवार व रविवार अर्थात १५ व १६ एप्रिल २०२३

  • केव्हा? : सकाळी ९ ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com