पिंपरी: स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नेहरूनगर कोविड सेंटरमधून कामावरून काढल्याचा निषेध
पिंपरी: स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन
sakal

पिंपरी: दीड वर्षे कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा केल्यानंतर अचानक कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ नेहरूनगर कोविड सेंटरबाहेर गुरुवारी (ता. १६) सकाळी सात वाजता आणि महापालिका प्रवेश द्वारासमोर सकाळी ११ वाजता स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

पिंपरी: स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पुणे: बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना तीन लाखांपर्यंतची कामे

नेहरूनगर कोविड सेंटरमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता. १५) रात्री मोबाईलवर कामावरून कमी केल्याचा मेसेज आला, त्यामुळे सर्वांमध्ये नाराजी पसरली. या कर्मचाऱ्यांचे कंत्राट ‘मेट ब्रिज हेल्थ केअर’ कंपनीकडे काही दिवस होते. ते बंद करून बीव्हीजी कंपनीला कंत्राट दिले. याची जराही कल्पना कर्मचाऱ्यांना मिळाली नाही, यामुळे सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तीन शिफ्टमध्ये एकूण १२० कर्मचारी कोविड सेंटरमध्ये काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना मानधनावर घेताना १६ हजार रुपये पगार देण्याचे कबूल केले होते. मात्र, त्यांच्या हाती ईपीएफ कपात होऊन १२ हजार पगार येत आहे. यातील बऱ्याच जणांना त्यांच्या ईपीएफची रक्कम खात्यावर मिळालेली नाही. तसेच, अनेकांकडे खाते क्रमांकच नाही. त्यामुळे आमच्या हक्काचा पैसा गेला कुठे? असा प्रश्नही कर्मचाऱ्यांनी विचारला.

"आम्ही कोरोनाकाळात सुरुवातीपासून राबलो. ज्येष्ठांना जेवण भरण्यापासून ते त्यांची सर्व शुश्रूषा केली. बऱ्याच ज्येष्ठांना स्वत:च्या हाताने अन्नदेखील ग्रहण करता येत नव्हते. अशावेळी आम्ही रात्रंदिवस सेवा केली. आता काम संपल्यावर आम्हाला हाकलून दिले, हे योग्य नाही. आम्ही कुटुंब कसे चालवायचे?"- प्रतिमा बनसोडे, साफसफाई कर्मचारी

"एका दिवसात आम्ही कोरोनाचे ५० शव बांधण्याचे काम कोविड सेंटरला केले. कोणी हात लावण्यासदेखील तयार नव्हते. रुग्णांची संख्या वाढली होती. अशा परिस्थितीत आम्ही कामकाजाच्या वेळेचा विचार न करता पडेल ते काम केले. आमचा ईपीएफ खात्यावर जमा नाही. केवळ ओळखपत्र आम्हाला दिले आहेत."- अर्चना उजागरे, साफसफाई कर्मचारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com