अंतर्गत रस्त्यांची कामे गतीने करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri

Pimpri : अंतर्गत रस्त्यांची कामे गतीने करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी : पिंपळे गुरवमधील साठ फुटी रस्त्याकडून मोरया पार्क गल्ली क्रमांक एक ते सहा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांची कामे करत असताना, आतील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच अंतर्गत रस्त्यांची कामेही गतीने करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

रस्त्यांची सुरू असलेली कामे व अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण, यामुळे नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत. मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण करताना अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष कशासाठी, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. या परिसरातील ड्रेनेज लाईन सतत तुंबत होती. त्यामुळे वर्षभरापूर्वी रस्ते खोदाई करून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. मात्र, नवीन ड्रेनेज लाइनचे चेंबर रस्त्याच्या वरच राहिलेले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन जाणे जिकिरीचे बनले आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

दुचाकीस्वारांना कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. मोरया पार्कच्या अंतर्गत रस्त्याची कामे जैसे थे अवस्थेत आहेत. मुळातच गल्यांमधील अरुंद रस्ते व अर्धवट कामांमुळे नागरिकांना नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. खोदकामे व खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणी साचून चिखल झाल्याने नागरिकांना पायी चालणे देखील जिकिरीचे बनत आहे.

जुन्या ड्रेनेज लाईन बदलून नव्याने टाकण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. एक महिन्याच्या कालावधीत ही कामे पूर्ण होतील.

- स्वप्नील शिर्के,

अभियंता स्थापत्य विभाग

येथील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन, तुंबणाऱ्या ड्रेनेज वाहिन्या बदलून नविन टाकण्यात आल्या आहेत. रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. विकासकामे सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे.

- सागर आंगोळकर,

नगरसेवक पिंपळे गुरव

loading image
go to top