
Pimpri : जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष
पिंपरी : कोविडनंतरचे मानसिक आरोग्य समस्यांबाबत विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी , निगडीतील ऑर्किड्स-द इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘एक लाफ्टर थेरपी सत्र आणि एक टॉक शो’ घेण्यात येणार आहे. रविवार (ता.१०) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थी, पालक आणि सर्व शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ या विषयाला हाताळतील आणि मानसिक सुदृढतेशी संबंधित शंका दूर करण्यास मदत करतील.
ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘‘सोच’’नावाचा एक विशेष शिक्षण विभाग आहे. हा विद्यार्थ्यांना शाळेकडून भावनिक आणि मानसशास्त्रीय पाठिंबा मिळत आहे. या बाबीची खात्री करण्यासाठी नियमितपणे निरीक्षण करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी एक उपक्रम आहे. अशा या ‘सोच’द्वारे विद्यार्थ्यांचे शहाणपण वाढवण्यासाठी निवडक मॉड्यूलद्वारे सामाजिक-भावनिक शिक्षण प्रदान केले जाते, जे आयुष्यभर त्यांच्या यशासाठी अत्यावश्यक असणारी आत्म-जागरूकता, आत्म-नियंत्रण आणि परस्पर वैयक्तिक कौशल्ये विकसित करते. सोचद्वारे इतर विषयांसह सामाजिक जागरूकता, ध्येय निश्चित करणे आणि जबाबदारपणे निर्णय घेणे या बाबींचा देखील विकास करते. १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यत महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभाग घेऊ शकणार आहेत.
असा असेल उपक्रम
जागरूकता महिन्यादरम्यान, ऑर्किडच्या सर्व शाखांचे विद्यार्थी सहकार्य करतील आणि मानसिक आरोग्याशी संबंधित शैक्षणिक व्हिडिओ आणि पोस्टर्स विकसित करतील. सोच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे शिक्षण कौशल्य कशा प्रकारे विकसित होईल, हे स्पष्ट करून ते त्यांच्या स्वतःचे सोच समाप्ती उपक्रम सामायिक करतील. कार्यक्रमाचे अंतिम वेळापत्रक समुपदेशकाच्या ‘‘ऑर्चॅडिओ प्रोग्राम्स’’नावाच्या टॉक शोमध्ये सादर केले जाईल. ज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेची चिंता, पौगंडावस्थेतील आव्हाने, पालक-मुलांचे संबंध, भावनिक कल्याण या सारख्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विषयांवर, समुपदेशक आणि प्राचार्य यांच्यातील चर्चेचा समावेश असेल. ऑर्किड्सद्वारे प्रत्येक आठवड्यात एक व्हिडिओ आणि एक सर्जनशील संवाद पोस्टर प्रसिद्ध केले जाणारआहे.
‘‘मुलाला जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिक आरोग्य मूलभूत आहे आणि आम्ही मुलाच्या फक्त पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी त्याच्या सर्वांगीण विकासावर काम करतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश कमी करू शकणाऱ्या तणाव, चिंता, नैराश्य किंवा इतर कोणत्याही वर्तणुकीच्या विकारांच्या भावनिक आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांबरोबर काम करतो. आम्ही विद्यार्थी, पालक आणि ऑर्किडच्या सर्व कर्मचाऱ्यांना अशा निरोगी पद्धतींचे पालन करण्याचे मार्गदर्शन करतो, ज्यांच्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.”
-नेहल जे. सेक्वेरा, समुपदेशक ऑर्किड्स-द इंटरनॅशनल स्कूल, निगडी
Web Title: Pimpri World Mental Health Day Special
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..