पिंपरी : कोरोनामुळे निधन झालेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये विनामूल्य सरपण देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करून अंत्यविधीसाठी सरपंच विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ढाके यांनी सांगितले.
मकोरोना मृतांचा अंत्यविधी हा फक्त विद्युत दाहिनीमध्ये करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. परंतु, शहरात उपचारासाठी शहराबाहेरील व ग्रामीण भागातील कोविड संसर्ग रुग्ण येतात. दुर्दैवाने उपचारादरम्यान काहींचा मृत्यू होतो. त्यामुळे शहरातील कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने दैनंदिन कार्यपद्धतींवर ताण वाढतो. त्याचा परिणाम म्हणून स्मशानभूमी परिसरात अंत्यविधीसाठी नंबर लावण्याची परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती शहरातील स्मशानभूमीमध्ये ओढवू नये, यासाठी कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर पारंपारिक पद्धतीने अंत्यविधी पार पाडण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी लागणारे सरपण विनामूल्य देण्यात येणार आहे.
फक्त कोविड काळात कोविड संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून सरपण खरेदीचा खर्च महापालिका उचलणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.